अंधेरी रेल्वे स्थानकावर महिलेचा चोरुन व्हिडिओ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक

अंधेरी (Andheri) रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी महिलेचा चोरुन व्हिडिओ काढणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे.

फोटो सौजन्य - फाइल फोटो

अंधेरी (Andheri) रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी महिलेचा चोरुन व्हिडिओ काढणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर पीडित महिला रेल्वे स्थानकावर बुकिंग ऑफिसच्या ठिकाणी थांबली असताना हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

भूषण नाईक असे आरोपीचे नाव आहे. त्यावेळी भूषण याने पीडित महिलेच्या दिशेने मोबाईल धरुन तिचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. मात्र महिलेला या आरोपी भूषणवर संशय आला त्यावेळी तिने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर महिलेला आरोपी आपले शूटींग करत असल्याचे समजले. तातडीने महिलेने पोलिसात या आरोपीविरुद्ध तक्रार केली.

या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी भूषणला अटक केली आहे. तर आरोपी हा बेरोजगार असून नालासोपारा येथे राहतो. पोलिसांनी या प्रकरणी त्याचा मोबाईल पाहिला असता त्यांना आरोपीच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीचे अधिक महिलांचे व्हिडिओ मिळाले आहेत.