Andheri Bypoll Result BJP: भाजपाने निवडणूक लढवली असती तर ऋतुजा लटकेंचा पराभव निश्चित होता, ठाकरे गटाच्या विजयानंतर भाजपची पहिली प्रतिक्रीया

ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय झाल्याचा खोचक टोला शेलारांनी लगावला आहे.

गेल्या महिन्यात राज्याच्या राजकारणात एकचं विषय रंगला होता तो म्हणजे अंधेरी पूर्व पोटनिवडणुक (Andheri East By Election) कोण लढणार? पण या निवडणुकीत एवढे काही आडेवेडे आलेत की मतदारी ही दंग झालेत. ठाकरे गटाकडून (Thackeray Group) ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं तर कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) या पक्षाने ठाकरे गटालाचं आपला पाठींबा दर्शवला तर दुसऱ्या बाजूल ज्या पक्ष नावासाठी, पक्षचिन्हासाठी शिंदे गटाने (Shinde Group) भांडाभांड केली त्यांनी आपला उमेदवार निवडणुकीत न उतरवता भाजपच्या उमेदवारास पाठींबा दर्शवला आणि भाजपने मुरजी पटेल (Murji Patel) यांना तिकीट दिलं. पटेलांनी अर्जही दाखल केला पण मनसे अध्यक्ष राज ठाकरेच्या (Raj Thackeray) एका पत्राने आणि राष्ट्रवादीचे (NCP) सर्वोसर्वे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्याने सगळा गेमचं पलटला आणि अखेर भाजपने निवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेतला.

 

नुकतीचं अंधेरी पूर्व मतदार संघातील निवडणुक पार पडली आणि आज अखेर निकाल जाहीर झाला तर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके सर्वाधिक मत मिळवत आमदार पदाच्या मानकरी ठरल्या. तरी राज्यातील सत्तांतरानंतर झालेली ही पहिलीचं निवडणुक आहे ज्यात ठाकरे गटाने टणचणीत विजय मिळवला. यावर मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलारांनी ट्वीट करत आली प्रतिक्रीया दिली आहे. (हे ही वाचा:- Aditya Thackeray On Andheri Bypoll Result: अंधेरीच्या विजयातून निर्माण झालेली उर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल- आदित्य ठाकरे)

ऋतुजाताईंचे अभिनंदन!! पण  भाजपाच्या मदतीमुळे मा. ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय झाल्याचा खोचक टोला शेलारांनी लगावला आहे. काँग्रेस (Congress),राष्ट्रवादी (NCP),भाकपडझनभर पक्षांनी पाठींबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता, अशा आशयाचं ट्वीट (Tweet) करत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) टोला लगावला आहे.