Andheri Bypoll Result 2022: उद्धव ठाकरे गटाचा जल्लोष, ऋतुजा लटके यांचा 58,775 मतांनी विजय

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Result) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांची मताधिक्याने विजयी घोडदौड सुरु आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) जल्लोष केला जात आहे. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या पार पडणार आहेत.

Andheri Bypoll Result 2022: उद्धव ठाकरे गटाचा जल्लोष, ऋतुजा लटके यांचा 58,775 मतांनी विजय
Rutuja Latke | (Photo Credit - Facebook)

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Result)  ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा  ऋतुजा लटके यांचा 58,775 मतांनी विजय झाला आहे.  त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) जल्लोष केला जात आहे. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या पार पडल्या. 15 व्या फेरीअखेर ऋतुजा लटके यांनी निर्णायक मते मिळवली आणि विजयाकडे कूच केली. दुसऱ्या बाजूला ऋतुजा लटके यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना किमान मतेही मिळवता आली नाहीत. त्याउलट मतदारांनी 'नोटा'ला मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली. जाणून घ्या ऋतुजा लटके यांना कोणत्या फेरीत किती मते.

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मतमोजणीच्या सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. चारही फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके आघाडीवर तर 'नोटा' दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळत आहे. फेरीनिहाय निकाल खालील प्रमाणे. (हेही वाचा, Andheri Bypoll Result 2022: अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक निकाल आज जाहीर होणार, मतमोजणीस सुरुवात)

मतमोजणीची पंदरावी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके -55946, बाळा नाडार -1286, मनोज नाईक - 785, मीना खेडेकर - 1276, फरहान सय्यद - 932, मिलिंद कांबळे - 546, राजेश त्रिपाठी - 1330

नोटा - 10906

एकूण मतमोजणी - 73007

मतमोजणीची आकरावी चौदावी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके -52507, बाळा नाडार -1240,मनोज नाईक - 748, मीना खेडेकर - 1190, फरहान सय्यद - 897, मिलिंद कांबळे - 519, राजेश त्रिपाठी - 1291

नोटा - 10284

एकूण - 68676

मतमोजणीची तेरीवी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके -48015, बाळा नाडार -1151,मनोज नाईक - 708, मीना खेडेकर - 1156,फरहा न सय्यद - 859, मिलिंद कांबळे - 499, राजेश त्रिपाठी - 1211

नोटा - 9547

एकूण मतमोजणी - 63146

मतमोजणीची आकरावी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके -42343, बाळा नाडार -1052,मनोज नाईक - 622, मीना खेडेकर - 948,फरहा न सय्यद - 753,मिलिंद कां बळे - 455,राजेश त्रिपाठी - 1067

नोटा - 8379

एकूण - 55619

मतमोजणीची दहावी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके -37469, बाळा नाडार -975,मनो ज नाईक - 584, मीना खेडेकर - 898,फ रहान सय्यद - 720,मि लिंद कांबळे - 428, राजेश त्रिपाठी - 986

नोटा - 7556

एकूण - 49616

मतमोजणीची नववी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके -32515, बाळा नाडार -897,मनोज नाईक - 543 , मीना खेडेकर - 863, फरहान सय्यद - 667, मिलिंद कांबळे - 409, राजेश त्रिपाठी - 889

नोटा - 6637

एकूण मतमोजणी - 43420

मतमोजणीची आठवी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके -29033, बाळा नाडार -819,मनोज नाईक - 458,मी ना खेडेकर - 789, फरहान सय्यद - 628, मिलिंद कांबळे - 358, राजेश त्रिपाठी - 787

नोटा - 5655

एकूण मतमोजणी - 38527

मतमोजणीची सातवी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके -24955, बाळा नाडार -733,मनोज नाईक - 416, मीना खेडेकर - 646,फरहा न सय्यद - 545, मिलिंद कांबळे - 312, राजेश त्रिपाठी - 679

नोटा - 4712

एकूण मतमोजणी - 32998

मतमोजणीची सहावी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके - 21090, बाळा नाडार -674, मनोज नाईक - 398, मीना खेडेकर - 587, फरहान सय्यद - 448, मिलिंद कांबळे - 291, राजेश त्रिपाठी - 621

नोटा - 4338

एकूण - 28447

मतमोजणीची पाचवी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके - 17278, बाळा नडार - 570,मनोज नाईक - 365,मी ना खेडेकर - 516, फरहान सय्यद - 378, मिलिंद कांबळे - 267, राजेश त्रिपाठी - 538

नोटा - 3859

एकूण - 23771

मतमोजणीची चौथी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके - 14648, बाळा नडार - 505, मनोज नाईक - 332, मीना खेडेकर - 437, फरहान सय्यद - 308, मिलिंद कांबळे - 246, राजेश त्रिपाठी - 492

नोटा - 3580

एकूण - 20548

मतमोजणीची तिसरी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके - 11361, बाळा नडार - 432,मनोज नाईक - 207,मीना खेडेकर - 2 81, फरहान सय्यद - 232, मिलिंद कांबळे - 202, राजेश त्रिपाठी - 410

नोटा - 2967

एकूण - 16092

मतमोजणीची दुसरी फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके - 7817, बाळा नडार -339,मनोज नाईक -113 ,मीना खेडेकर -1 85,फरहान सय्यद -154, मिलिंद कांबळे - 136, राजेश त्रिपाठी - 223

नोटा -1470

एकूण -10437

मतमोजणीची पहिली फेरी (उमेदवार निहाय मतदान)

ऋतुजा लटके- 4277, बाला नाडार - 222,मनोज नाईक - 56, मीना खेडेकवर- 138,फरहान सय्यद- 103, मिलिंद कांबळे- 79, राजेश त्रिपाठी- 127

नोटा -622

एकूण मत : 5624

एखाद्या विधानसभा पोटनिवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान मिळण्याची राज्यातील बहुदा ही पहिलीच घटना असावी. दरम्यान, नोटाला मिळालेल्या मतदानावरुन आता चांगलेच राजकारण रंगले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अंधेरीमध्ये नोटाला मिळालेले मतदान हे भाजपचे असल्याचा दावा केला आहे. तर नोटाला मतदान ही स्थानिकांची भावना असावी असे भाजपने म्हटले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2022 01:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).