मुंबईकरांनो सावधान ! गिरगाव चौपाटीवर यंदाही स्टिंग रे माशांचा धोका
मुंबई : अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचं विसर्जन होणार आहे. मुंबईत गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात काही घरगुती आणि सार्वजनिक गणेशमुर्तींचं विसर्जन होतं. मात्र यंदा तुम्ही गणेशविसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जाणार असाल तर सावधान ! कारण गिरगाव चौपाटीवर यंदाही स्टिंग रे माशांचा उपद्रव वाढला आहे.
स्टिंग रेमुळे वेदनादायी जखमा
गणेशोत्सवाचा काळ हा स्टिंग रे माशांचा प्रजनन काळ आहे. या काळामध्ये स्टिंग रे माशाच्या शेपटामध्ये न्युरो टॉक्सिन घटक वाढतात. मानवी शरीराशी त्यांचा संपर्क होणं अत्यंत त्रासदायक ठरू शकते.
मुंबईकरांमध्ये भीती
2013 साली गणेशोत्सवामध्ये गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी गेलेल्या सुमारे 150 गणेशभक्तांना स्टिंग रे माशांचा दंश झाला होता.
कोणती काळजी घ्याल ?
समुद्रात जाताना गम बूटचा वापर करा.
स्वतःहून समुद्रात जाऊन गणपती विसर्जन करण्यापेक्षा स्वयंसेवक किंवा समुद्रावर असलेल्या रक्षकांच्या मदतीने गणेशमूर्तींचं विसर्जन करा.
शक्य असल्यास कृत्रिम तलावांचा वापर करा. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूकीदरम्यान 'या' गोष्टींबाबत सुरक्षा नक्की बाळगा