Anandwan Corona's Hotspot: आनंदवन कोरोना हॉटस्पॉट, COVID 19 संक्रमितांची संख्या वाढल्याने बाहेरील लोकांना प्रवेश बंदी
या सेंटरमध्ये सध्यास्थितीत 83 रुग्णांवर उपाचर सुरु आहेत. आनंदवन परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चंद्रपूर (Chandrapur ) जिल्ह्यातील आनंदवन (Anandvan) हे कोरोना व्हायरस (Coronavirus ) संसर्गाचा नवा हॉटस्पॉट (Corona Hotspot) ठरत असल्याचे पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार आनंदवन येथील सुमारे 239 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी दोघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आनंदवन येथे आतापर्यंत 1200 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यपैकी 239 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले असून प्रतिदिन 250 लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आनंदवनमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
आनंदवन येथील कोरोना संसर्गाचा निपटारा करण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी एक कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. या सेंटरमध्ये सध्यास्थितीत 83 रुग्णांवर उपाचर सुरु आहेत. आनंदवन परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (हेही वाचा, Janta Curfew in Jalgaon: जळगाव मध्ये 11 ते 15 मार्च पर्यंत जनता कर्फ्यू; काय राहणार सुरु काय बंद? जाणून घ्या)
दरम्यान, सांगितले जात आहे की, आनंदवन परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढण्याचे कारण म्हणजे तिथली व्यवस्था आहे. आनंदवनमध्ये सुरुवातीपासूनच सामूहिक कार्यावर भर देण्यात येतो. मग ती सामुहीक प्रार्थना असो किंवा सामुहीक जेवण. इथे अधिकाधिक गोष्टी या सामूहिक पद्धतीने होतात. कदाचित त्याचमुळे या ठिकाणी कोरोना संक्रमितांची संख्या अधिक वाढली असावी असे बोलले जात आहे.
दरम्यान, राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. काल (9 मार्च) दिवसभरात राज्यात 9927 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर उपचार घेऊन बरे झालेल्या 12182 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्या आजघडीला एकूण 95322 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.34% इतके आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.