Amul Topical: मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याचा अमूल कंपनीने दिला इशारा, पाहा ट्वीट
तर काही नागरिकांना आपले घर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे.
राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही नागरिकांना आपले घर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. त्याचसोबत राज्यातील विविध धरणे आणि नद्या तुडूंब भरल्याने त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या परिस्थितवर भाष्य करणारे एक फोटो शेअर केला आहे.
अमूलने शेअर केलेल्या फोटोत, नद्या तुडूंब वाहून गेल्याने हजार स्वप्न त्या सोबत मातीत मिळाली असल्याचे म्हटले आहे. तसेच अमूल तुमच्यासोबत पावसाळा असो किंवा उन्हाळा नेहमी राहणार असे सुद्धा म्हटले आहे. फोटोतील मुलगी एका लाकडी फळीवर उभी असून हातात काठी असल्याचे तिच्याकडे दिसून येत आहे. तर नदीतून या दोन गोष्टींचा आधार घेत ती स्वत:ला सांभाळत पुढे जात असल्याचे दिसून येत आहे.(गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अमूल कंपनीची खास श्रद्धांजली Photo)
पुढील काही दिवस जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून घरात पिण्याचे पाणी, अन्न आणि अन्य महत्वाच्या गोष्टी आणून ठेवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.