मकरसंक्रांती आणि लोहरी च्या शुभेच्छा देत अमृता फडणवीस यांचे खास ट्विट; मात्र 'अशी' झाली गमंत
यामध्ये गंमत अशी की अमृता यांनी लोहरीच्या अक्ख्या एक दिवस नंतर आणि मकरसंक्रांतीच्या संपूर्ण एक दिवस आधी या शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विटर वर आपल्या जहाल टीकांमुळे मागील काही दिवसात चर्चेत आलेल्या माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आज मात्र सर्वाना तीळ गुळ घ्या गोड गोड बोला असे सांगत मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) आणि लोहरी (Lohri) सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये गंमत अशी की अमृता यांनी लोहरीच्या अक्ख्या एक दिवस नंतर आणि मकरसंक्रांतीच्या संपूर्ण एक दिवस आधी या शुभेच्छा दिल्या आहेत. वास्तविक दरवर्षी 14 जानेवारी या ठरवलेल्या दिवशी पंजाब (Punjab) मध्ये लोहरी, महाराष्ट्र (Maharashtra) , गुजरात (Gujrat) मध्ये मकरसंक्रांत आणि तामिळनाडू (Tamilnadu) सहित दक्षिण भारतात पोंगल (Pongal) साजरा केला जातो पण यंदा लीप वर्ष असल्याने या सणांच्या तारखा मागे पुढे आल्या आहेत,परिणामी अमृता यांचा देखील गोंधळ झालेला असावा पण तरीही त्यांच्या शुभेच्छांना नेटकरी समोरून शुभेच्छाच देत प्रतिसाद देत आहेत.
अमृता फडणवीस यांनी आपल्या पोस्ट मध्ये आपला एक ट्रेडिशनल लुकचा फोटो शेअर केला आहे. राजकारणी आणि त्यांच्या कुटुंबाच्या अगदी ठरवलेल्या परिधानांच्या पलीकडे जाऊन आपल्या स्टाईलने एक वेगळी छाप निर्माण केली आहे. हीच छाप आज त्यांनी शेअर केलेल्या फोटो मधून सुद्धा दिसून येते. अमेरिकेतील 'जय हो म्युझिकल कॉन्सर्ट' मधील अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत (Photos)
अमृता फडणवीस ट्विट
दरम्यान, मागील काही दिवसात शिवसेना आणि एकूणच महाविकास आघाडी वर टीका करणाऱ्या ट्विटस मुळे अमृता फडणवीस चर्चेत आल्या होत्या, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदी नियुक्तीपासून या ट्विट टीकांना तर अगदी उधाण आले होते.