Amruta Fadnavis: एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला पाठींबा दर्शवत महाराष्ट्रात घराणेशाही संपवण्याच्या दिशेने भाजपचं महत्वाचं पाऊल: अमृता फडणवीस

पंतप्रधानांच्या घराणेशाही बाबत वक्तव्यास पाठींबा दर्शवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रीया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day)  लाल किल्यावरुन (Red Fort) देशातील जनतेशी विशेष संवाद साधला. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीवर (Nepotism) विशेष निशाणा साधला.भ्रष्टाचार (Corruption) आणि घराणेशाही हे देशाला लागलेली कीड आहे, असं विधान पंतप्रधान यांनी केलं आहे. देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी निर्धार केला आहे. तसेच आपल्या अनेक संस्था या घराणेशाहीमुळे प्रभावित आहे. भाऊ- भाच्याचे राजकारण (Politics) सुरू आहे. आपल्याला त्याविरोधात लढावे लागणार आहे. आपल्याला आपल्या संस्था आणखी ताकदवर कराव्या लागणार आहे, आपली योग्यता ओळखून पुढे जाण्यासाठी घराणेशाहीविरोधात जागरूकता दाखवावी लागणार आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी घराणेशाहीवर निशाणा साधला आहे.

 

पंतप्रधानांच्या घराणेशाही (Nepotism) बाबत वक्तव्यास पाठींबा दर्शवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील आपली प्रतिक्रीया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला पाठींबा दर्शवत महाराष्ट्रात (Maharashtra) भाजपने (BJP) घराणेशाही संपवण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकलेलं आहे. भाजप घराणेशाहीचं समर्थन करत नाही याबाबच एक ज्वलंत उदाहरण महाराष्ट्र भाजपने देशासमोर ठेवलं आहे, अशी प्रतिक्रीया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. (हे ही वाचा:- Ajit Pawar On PM Modi: पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्त्युत्तर)

 

अमृता फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात (Cabinet Ministry) एकाही महिलेचा समावेश नसल्याबाबत अमृता फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, महिलांना नक्कीच मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे. पण महिलांनी मंत्रिपदाची डिमांड करण्यापेक्षा पुरुषांएवढीच मेहनत करून त्या पदावर कमांड मिळवली पाहिजे. त्यावेळी महिलांना जास्त मान मिळेल, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले. म्हणजेचं महिलांनी कुठल्याही आरक्षणावर (Reservation) अवलंबून राहण्यापेक्षा स्वतच्या कर्तुत्वाच्या जोरावर मंत्रीपद मिळवण्याचा सल्ला अमृता फडणवीसांनी दिला आहे.