Amruta Fadnavis: ..तर देवेंद्र फडणवीसांनी माझा गळा पकडला असं मला वाटतं, अमृता फडणवीसांचा अजब खुलासा
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या नात्याबाबत असा काही खुलासा केला की तो आजपर्यत कधी कुणाला कळलेला नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नुकत्याच झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) बस बाई बस (Bas Bai Bas) या कार्यक्रमात येवून गेल्यात. अमृता फडणीसांनी हजेरी लावलेला हा एपिसोड (Episode) राज्याच्या राजकारणात देखील चर्चेचा विषय ठरला आहे. एवढचं नाही तर त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या नात्याबाबतीत (Relation) देखील त्यांनी काही मोठे खुलासे केले आहेत. बस बाई बस या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमाचं संचालन अभिनेता सुबोध भावे (Actor Subodh Bhave) करतात आणि आमंत्रीत केलेल्या पाहूण्यास विविध प्रश्न विचारले जातात. इतर पाहुण्यांप्रमाणे अमृता फडणवीस यांना देखील सामाजिक, राजकिय (Political) किंवा त्यांच्या वैयक्तीक (Personal Life) आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आलेत. या सगळ्या प्रश्नांची अमृता फडणवीस यांनी नेहमी प्रमाणेचं खुलून उत्तर दिली.
दरम्यान अमृता फडणवीस यांनी त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या नात्याबाबत असा काही खुलासा केला की तो आजपर्यत कधी कुणाला कळलेला नाही. तो खुलासा म्हणजे असा अमृता फडणवीस गळ्यात मंगळसूत्र (Mangal Sutra) घालत नाहीत तर त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घालत नाहीत तर तुमची सासू म्हणजे देवेंद्र फडणवीसांची आई तुम्हाला रागवत नाहीत का? तर त्यावर अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं मी गळ्यात मंगळसूत्र घातलं तर माझ्या नवऱ्याने म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी माझा गळा धरल्यासारखं वाटतं म्हणून मी गळ्यात मंगळसूत्र घालत नाही. (हे ही वाचा:- Saamana Article: मुख्यमंत्री पदाची वरमाला गळ्यात घातली पण मंत्रीमंडळ जन्माला आलं नाही, सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर हल्लाबोल)
तसेच मी गळ्यात मंगळसूत्र घालत नसले तरी हातात मंगसूत्र घालते कारण देवेंद्र फडणवीसांनी माझा गाळा धरण्या ऐवजी माझा हात धरलेला मला अधिक आवडत म्हणून मी गळ्यात मंगळसूत्र घालण्या ऐवजी हातात मंगळसूत्र घालते. नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून नवऱ्याने गळा पकडल्यासारखं वाटण्यापेक्षा मला माझ्य् नवऱ्याने हात धरणं अधिक आवड असं उत्तर अमृता फडणवीसांनी या कार्यक्रमा दरम्यान दिलं.