Amruta Fadnavis On Bhide Guruji: संभाजी भिडेंच्या 'त्या' वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रीया; म्हणाल्या, भिडे गुरुजींबद्दल आदरचं पण..

भिडे गुरुजींच्या महिलांच्या टिकली लावण्याच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रीया

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) चांगलीचं चर्चा होत आहे. नेते मंडळी, विरोधक, महिला आघाडी यांच्या कडून भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर विविध प्रतिक्रया येत आहेत. तरी आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी भिडे गुरुजींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रीया दिली आहे. तरी अमृता फडणवीसांची ही प्रतिक्रीया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण अमृता फडणवीस या कायम महिला (Women), महिला सबलीकरण (Women Empowerment), महिला सक्षमीकरण याबाबत भाष्य करताना दिसतात. एवढचं नाही तर मॉर्डन मिसेस मुख्यमंत्री अशा कमेंटंसही त्यांच्या सोशल मिडीयावर (Social Media) बघायला मिळतात. भारताची संस्कृती जपत हातात मंगळसूत्र घालणारऱ्या अमृता फडणवीस भिडे गुरुजींच्या टिकलीच्या वक्तव्यावर काय भाष्य करणार यावर सर्वाचं लक्ष लागलं होत.

 

भिडे गुरुजींच्या (Bhide Guruji) महिलांच्या टिकली लावण्याच्या वक्तव्यावर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या, माझ्या मनात भिडे गुरुजींबद्दल आदर आहे. ते हिंदुत्वाचे स्तंभ आहेत. पण मला असं वाटतं. महिलांनी कसं जगावं हे कोणी सांगू नये, तिची एक जीवनशैली असते, त्याप्रकारे ती जीवन जगत असते. (हे ही वाचा:- Sanjay Shirsat On Sushma Andhare: माझ्यात असलेल्या हिम्मतीच्या जोरावर मी कधी लाचार होणार नाही, आमदार संजय शिरसाट यांचं सुष्मा अंधारेंना प्रत्युत्तर)

 

संभाजी भिडे यांचं एक वादग्रस्त वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. एका महिला पत्रकाराला केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे हे पुन्हा वादात सापडले आहेत. संभाजी भिडे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मंत्रालयात आले होते. तेव्हा महिला पत्रकाराने संभाजी भिडेंना प्रश्न विचारला असता भिडे गुरुजी म्हणाले 'आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,' अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी  दिली. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.