
अमरावती (Amravati) मध्ये जय बजरंग विद्यालय मध्ये 10वीच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. हा विद्यार्थी 15 वर्षांचा होता. शाळेत विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने दुखावल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला होता. या मुलाचं नाव विवेक महादेव राऊत होते. वर्गात प्रश्नांची उत्तरे देऊ न शकल्याने विवेकला फटकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सूर्यवंशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या शिक्षकाने त्याला फटकारले आणि इतर विद्यार्थ्यांसमोर त्याला लाजवले, त्यामुळे विवेक खूप अस्वस्थ झाला. घटनास्थळावरून सापडलेल्या सुसाईड नोटनुसार, सार्वजनिकरित्या झालेल्या अपमान आणि त्याच्या पालकांना त्याच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल माहिती देण्याची धमकी देऊन या टोकाच्या पावलासाठी त्याच्या शिक्षकाला जबाबदार धरले.
विवेक च्या त्या चिठ्ठीत मुलाने म्हटले आहे की, "मी स्वतःला फाशी देत आहे... कारण सूर्यवंशी शिक्षकाने माझ्यावर हल्ला केला आणि माझ्या पालकांबद्दल बोलले." दरम्यान या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी शिक्षकाला मारहाण केल्याचे वृत्त आहे, ज्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांनी सविस्तर तपास सुरू केला आहे. Pune Coaching Class Scandal: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; दोन प्राध्यापकांवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, पुणे येथील घटना.
आज मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेतील 40 वर्षीय महिला शिक्षिकेला गेल्या एक वर्षात 16 वर्षीय विद्यार्थ्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. विवाहित आणि मुले असलेली ही महिला लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers:
Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.