Amravati Crime: विवाहसोहळ्यात तरुणी कपडे बदलताना काढला व्हिडिओ; विकृतांना वऱ्हाडींनी बदडले

मोहम्मद फुजेल मो. शौकत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Arrest pixabay

अमरावती जिल्ह्यातील एका लग्नसमारंभादरम्यान मंगल कार्यालयातील खोलीत तरुणी कपडे बदलत होत्या. त्याचवेळी एका तरुणाने गुपचूप खिंडकीतून त्यांचा व्हिडीओ बनवणे सुरू केले. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच वऱ्हाड्यांनी तरुणाला बेदम चोप दिला. तसेच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मोहम्मद फुजेल मो. शौकत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलीचा लग्नसमारंभ तेथीलच एका मंगल कार्यालयात आयोजित करण्‍यात आला होता. गुरुवारी रात्री काही तरुणी मंगल कार्यालयातील एका मेकअप करत होत्या. काही तरुणी कपडे देखील बदलत होत्या.

यावेळी एका तरुणाने गुपचूप या ठिकाणी खिडकीतून तरुणींचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढणे त्याने सुरू केले. यावेळी काही वऱ्हाड्यांनी आरोपीला पाहिले. त्‍याला जाब विचारण्‍यात आल्‍यानंतर त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याचा मोबईल पाहिला असता त्यात रेकार्डिंग दिसून आली. मोबाइलमधील व्हिडीओ पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अनेकांनी त्या तरुणाला बेदम चोप दिला. आरोपी तरुणाने मार बदल्यानंतरही मी असे केले नाही असे त्याने म्हटले.

यानंतर सर्वांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेले असता त्यांने आरोपाची कबुली दिली. त्याच्याकडून तीन मोबाईलदेखील जप्त करण्यात आले. पाठोपाठ आरोपीने ज्या मुलींचे कपडे बदलतानाचे रेकॉर्डिंग केले, त्या मुलींची नातेवाईक असलेली ५२ वर्षीय महिला अंजनगाव पोलीस ठाण्यात पोहोचली. आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



संबंधित बातम्या