अमरावती येथे विलगीकरण करण्यात आलेल्या 28 वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या, पोलिसांकडून तपास सुरु

त्यामुळे नागरिकांना आता अधिक खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना आता अधिक खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही आहे. परंतु वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून कोरोना संक्रमित रुग्णांर उपचार करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती येथे विलगिकरण करण्यात आलेल्या एका 28 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

नांदगाव खंडेश्वर मधील शासकीय निवासी संकुलात ही घटना घडली आहे. या ठिकाणी विलगिकरण करण्यात आलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळच्या वेळेस घडल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु तरुणाने आत्महत्या का केली याबाबत अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.(घाटकोपर: मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काजीपणामुळे एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू; मयताच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांवर बीएमसीने दिले स्पष्टीकरण)

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जरी वेगाने वाढत असला तरीही मृत्यदर कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तर एकूणच महाराष्ट्रातील कोरोनच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास आकडा 152765 वर पोहचला असून 7106 जणांचा बळी गेला आहे. राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार नियमात शिथीलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.