विधानसभा निवडणूक: अमित शाह यांचा हादरा; एकनाथ शिंदे, अजित पवार यांना धक्का; महायुती फुटण्याचे संकेत

अशात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी केलल्या वक्तव्यामुळे CM एकनाथ शिंदे आणि DCM अजित पवार यांच्या गोटात चिंता पसरली आहे.

Amit Shah, Eknath Shinde, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Polls 2024) डोळ्यासमोर ठेऊन महायुती (Mahayuti) आणि महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) जोरदार कामाला लागली आहे. त्यातही महायुतीचे घटक पक्ष भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सत्ताधारी असल्याने अधिक सावध आहेत. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असातना केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना जोरदार धक्का दिला आहे. या वेळच्या (2024) विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत येईल मात्र, विधानसभा निवडणूक 2029 मध्ये भाजपा हा एकटाच सत्तेत येईल, असे वक्तव्य शहा यांनी केले आहे.

महायुती फुटण्याचे संकेत?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हटले आहे की, आपण विधानसभा निवडणूक जिंकत आहोत. नेटाने कामाला लागा. कोणत्याही सर्वे आणि वक्तव्यांवर लक्ष देऊ नका. आताची विधानसभा निवडणूक (2024) आपण जिंकत आहोत. पण आगामी म्हणजेच सन 2029 मध्ये होणारी विधानसभा महाराष्ट्रात भाजप एकटाच जिंकणार आहे. त्यामुळे सर्वांनी जोरदार तयारीला लागा. भाजप नेते शाह यांनी केलेल्या वक्तव्यामध्येच महायुती फुटण्याचे संकेत दडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कारण महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा घटक पक्ष आहे. उर्वरीत शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे मूळ पक्षासोबत बंडखोरी करुन तयार झाले असून उशीरा महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. सहाजिकच या पक्षांच्या राजकीय भवितव्यावर चिंता निर्माण झाली आहे. (हेही वाचा, Ajit Pawar NCP: महायुती पेचात, भाजपचे कट्टर हिंदुत्त्व आणि अजित पवार यांचे मुस्लिम कार्ड; शिंदे सेनेचे काय?)

एकनाथ शिंदे यांची शिवसेना चिंतेत

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांनी स्वत:च्याच पक्षाचे सरकार सत्तेत असताना ते पाडले. जवळपास 30 आमदार सोबत घेऊन ते सुरुतमार्गे गुवाहाटीला गेले. तिथे त्यांच्यासोबतच्या आमदारांची संख्या जवळपास 40 इतकी झाली. त्यांनी केवळ आपल्या पक्षाचे सरकारच पाडले नाही तर थेट पक्षावरही दावा सांगितला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तत्परतेने त्यांना शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण मिळाले. हे सर्व भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारचा वरदहस्त असल्यामुळेच घडले अशी उघड चर्चा आहे. त्यामुळे या पक्षाचे आणि नेतृत्वाचे सर्व काही भवितव्य भाजपवरच अवलंबून असल्याची स्पष्टता नाकारता येत नाही. अशा स्थितीत भाजपच्या प्रमुख नेत्याने हे वक्तव्य केल्याने या पक्षात चिंतेचा सूर उमटू लागला आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील चिंतेत असल्याचे समजते. (हेही वाचा, Sharad Pawar: 'घरात आम्ही सर्व एकत्र असतो'; चिपळूणमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शदर पवारांची प्रतिक्रीया)

अजित पवार यांचे भवितव्य काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या पक्षचिन्हावर दावा सांगत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कृपेतनेऱ्या मिळविणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कंपूमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. अमित शाह यांच्या विधानातून थेट अर्थ निघतो की, विधानसभा नवडणूक 2024 जरी महायुतीद्वारे लढली जात असली तरी, भविष्यात ही महायुती राहिलच याची खात्री नाही. त्यामुळे आता जरी एकत्र लढलो तरी भविष्यात स्वबळावरच लढावे लागणार आहे. त्यामुळे आताच सबत लढायचे की नाही? असा सवाल अजित पवार यांच्या गोटात निर्माण झाला आहे. त्यातून अनेक आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत जाण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीचे पुढे काय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.