बॉम्बे ट्रस्टच्या जुमा मशीद कडून लाऊड स्पीकर बंदी वर तोडगा;  Al Islaah अ‍ॅप द्वारा आता लाइव्ह अजान, नमाज पाहता येणार

त्यासाठी लाऊड स्पिकरचा वापर केला जात होता. पण त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंधनं आणली आहेत त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून ही रीतही पाळली जाणार आहे.

अझान लाऊड स्पीकर (Azan Loudspeaker Controversy)  वरून देशभरात वातावरण पेटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने भोंगे उतरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.  मुंबई मध्येही यावरून मनसे आक्रमक झाली आहे. पण सामंजस्याने यामधून मार्ग काढताना महाराष्ट्र कॉलेजच्या आय टी अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी ‘Al-Islaah’ बनवलं आहे. या अ‍ॅप द्वारा आता मुस्लिम धर्मियांना अझान लाईव्ह ऐकता येणार आहे. बुधवारी हे अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे. दरम्यान मुंबई शहरामध्ये अशाप्रकारे अझान लाईव्ह ऐकवणारं हे पहिलंचं अ‍ॅप आहे. अ‍ॅन्ड्राईड आणि आयओएस वरही हे अ‍ॅप उपलब्ध आहे.

मुस्लिम धर्मामध्ये नमाजासाठी लोकांना बोलावणे हा त्यांच्या धर्माचाच एक भाग आहे. त्यासाठी लाऊड स्पिकरचा वापर केला जात होता. पण त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंधनं आणली आहेत त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून ही रीतही पाळली जाणार आहे. स्पीकर ऐवजी स्मार्टफोनवर लोकांना प्रार्थनेसाठी एकत्र केले जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: Loudspeaker Row In Maharashtra: मनसे च्या आक्रमक भूमिकेनंतर मुंबई मध्ये भेंडीबाजार ते मिनार परिसरातील 26 मशिदींचा पहाटेची अजान भोंग्यांशिवाय देण्याचा निर्णय .

Al-Islaah अ‍ॅपवर एक पब्लिक ॲड्रेस सिस्टम आहे. त्याच्या मदतीने मशीद अथॉरिटी लोकांना कोणतीही माहिती देऊ शकणार आहे. सोबतच, ॲप यूजर्स कम्यूनिटी लीडर्सला आपले प्रश्न पाठवू शकतील त्याचा वापर जुम्मेसाठी केला जावू शकतो. नमाजही लाईव्ह पाहण्याची सोय या अ‍ॅप मध्ये आहे.