वांद्रे वरळी सी-लिंक वर प्रवाशांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका तैनात करण्याचे हायकोर्टाचे आदेश

वरळी सी लिंकवर (Worli Sea Link) एक रुग्णवाहिका ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिले आहेत.

Bandra Worli Sea Link (Photo Credits-Wikimedia Commons)

अवघ्या काही दिवसांत मुंबईची ओळख बनलेले वांद्रे वरळी सी-लिंकवर लवकरच एक नवीन सेवा सुरु करण्यात येणार आहे. या नवीन सेवेत वरळी सी लिंकवर (Worli Sea Link) एक रुग्णवाहिका ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिले आहेत. वांद्रे-वरळी सी लिंकवर अनेकदा खासगी वाहने वेगमर्यादा ओलांडून धावताना दिसतात. अशा वेळी अपघातांचे प्रमाण वाढले तर काय? हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मुंबई हायकोर्टाने हा निर्णय घेतला आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, वरळी सी लिंकवर अपघात झाल्यास सुरक्षेच्या दृष्टीने हे खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वारंवार होणारे अपघात आणि त्यात वाढणारे मृत्यू तसेच काही राष्ट्रीय महामार्गांवरील अशा स्थितीकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका 'असोसिएशन फॉर एडिंग जस्टिस' या स्वयंसेवी संस्थेने अॅड. दीपेश सिरोया यांच्यामार्फत केली होती. त्यात उत्तर दाखल करताना एक्स्प्रेस-वे तसेच अन्य महामार्गांवर आता रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती 'एमएसआरडीसी'तर्फे अॅड. विजय पाटील यांनी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाला दिली.

हेदेखील वाचा- मुंबई: दादर रेल्वे स्टेशन ते केईएम नवीन एसी बससेवा सुरु

बेजबाबदार वाहनचालकांमुळे अपघात घडतात आणि इतरांचे प्राण जातात. त्यामुळे या सी-लिंकवरही रुग्णवाहिका तैनात ठेवण्याचा विचार करा. तसे केल्यास चांगले होईल. कदाचित ते पाहूनही बेजबाबदार वाहनचालकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होऊ शकेल', असे निरीक्षण खंडपीठाने यावेळी नोंदवले. तसेच त्याअनुषंगाने निर्देश देत ही जनहित याचिका निकाली काढली.

वरळी सी लिंक वर वेगवान वाहने चालवणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तेथे सीसीटीव्ही बसवले आहेत. पोलिस तैनात करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक बेजबाबदार वाहनचालकांमुळे अपघात होतात. अशा वेळी त्वरित उपाय म्हणून ही रुग्णसेविका तैनात करण्याचे उच्च न्यायलयाने आदेश दिले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif