अंबरनाथ: केकमध्ये आढळली अळी, विक्रेत्यावर गुन्हा दाखल
याप्रकरणी केक विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ (Ambernath) येथे केक मध्ये अळी सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी केक विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओ केक नावाच्या दुकानातील हा प्रकार समोर आला आहे. या दुकानातून मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त केक घेतला. मात्र केक कापल्यानंतर त्यामधून अळी असल्याचे दिसून आला. त्यामुळे महिलेने तो केक पुन्हा दुकानदाराकडे घेऊन जात त्याबद्दल तक्रार केली.(निकृष्ट दर्जाच्या बर्गरमुळे मॅकडोनाल्डला 70 हजारांचा भुर्दंड, पाच वर्षांपूर्वी बर्गरमध्ये सापडल्या होत्या अळ्या)
मात्र त्यावेळी केक विक्रेत्याने या खराब केक ऐवजी दोन केक घेऊन जा अशी विनंती महिलेला केली. मात्र नंतर याच दुकादाराने महिलेसोबत दुकानाबाहेर वाद घातला. या प्रकरणी दुकानातील केकचे नमून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर या दुकानदारावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहितील एफडीएने दिली आहे.