अमन लॉज - माथेरान दरम्यान मिनीट्रेन आजपासून पुन्हा धावणार; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक

मात्र अजूनही नेरळ ते माथेरान असा टप्पा सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे.

Matheran Toy Train | Poto Credits: Twitter/ Central Railway

Aman Lodge - Matheran Toy  Train Timetable:  मागील 4 महिन्यांपासून बंद असलेली माथेरानची मिनीट्रेन आज (27 डिसेंबर) पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ख्रिसमस, न्यू इयर या सुट्ट्यांदरम्यान पर्यटकांसाठी ही मोठी खूषखबर आहे. अमन लॉज (Aman Lodge) ते माथेरान (Matheran) दरम्यान मिनी ट्रेन शटल फेर्‍या सुरू करण्याचा निर्णय आता मध्य रेल्वेने जाहीर केला आहे. मात्र अजूनही नेरळ ते माथेरान असा टप्पा सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे.

यंदा पावासामध्ये मिनीट्रेनच्या रूळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी 9 ऑगस्टपासून या टॉयट्रेनच्या फेर्‍या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्याने मध्य रेल्वे कडून ख्रिसमस दिवशी टॉयट्रेनची चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाल्याने अमन लॉज ते माथेरान अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यान मिनी ट्रेनच्या फेर्‍या असतील. या फेर्‍‍या वीक डेजमध्ये 8 आणि विकेंडला 10 असतील.

अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावाणार्‍या मिनीट्रेनचं वेळापत्रक

दिनांक २७.१२.२०१९ पासून अमन लॉज व माथेरान दरम्यान शटल सेवा सुरु. pic.twitter.com/fgvYQDAIhn

युनेस्को कडून 2003 साली माथेरानच्या या मिनी ट्रेनला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. मे 2016 मध्ये दोन वेळा ट्रेन रूळांवरून घसरली होती तेव्हा हा मार्ग दुरूस्तीसाठी बंद ठेवला होता. दरम्यान पावसात 22 ठिकाणी रुळाखालील खडी वाहून जाण्यासह अन्य समस्यांचा सामना करत असलेली टॉयट्रेन खबरदारीचे उपाय म्हणून मध्य रेल्वेने  बंद केली होती. आजपासून पुन्हा मिनी ट्रेनला द्वितीय श्रेणीचे तीन डबे, प्रथम श्रेणीचा एक डबा आणि दोन बॅरेक व्हॅन जोडले आहेत.