हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्रात 17 ऑक्टोबरपासून वादळी पावसाची शक्यता
आक्टोबर महिन्याचा शेवट होत आला तरी, पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही. यावर्षीच्या मुसळधार पावसाने कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli) पुणे (Pune) शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. नागरीक या नुकसानीतून पूर्णपणे सावरले नसताना, नुकताच हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला असून येत्या १७ ऑक्टोबरपासून राज्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
यावर्षीच्या पावसाने (Heavy Rain) संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) झोडपून काढले आहे. आक्टोबर महिन्याचा शेवट होत आला तरी, पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही. यावर्षीच्या मुसळधार पावसाने कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli) पुणे (Pune) शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. नागरीक या नुकसानीतून पूर्णपणे सावरले नसताना, नुकताच हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला असून येत्या १७ ऑक्टोबरपासून राज्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुण्यासह राज्यातील बहुंताश भागांमध्ये गेले 2 दोन दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, काही ठिकाणी दुपारनंतर ढग जमा होऊन सायंकाळी हलक्या ते माध्यम सरी पडत आहेत. पावसाने उसंती घेतल्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी तापमान 30 ते 40 सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. यातच हवामान खात्याने राज्यात वादळी पाऊस कोसळणार, अशी शक्यता वर्तवली आहे. गुरुवारी 17 ऑक्टोबर पासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस पडणार अशी माहिती दिली आहे. यामुळे संबधित भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- यंदाच्या पावसाने फक्त पाच दिवसात गेल्या आठ वर्षातील केले रेकॉर्डब्रेक
पुणे करांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पुण्यात उद्या 16 ऑक्टोबर रोजी पावसाला सुरुवात होणार असून सलग सलग 3 तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान 51 ते 75 टक्के पाऊस पडणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने वर्तवला आहे.