Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपीचे वडील Anna Shinde यांच्याकडून Bombay HC मध्ये याचिका दाखल; 'बनावट एन्काऊंटर मध्ये मारल्याचा' आरोप
या प्रकरणातील फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा, अन्यथा आम्हाला वेगळी पावले उचलावी लागतील, असा कडक इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
बदलापूर (Badlapur) मध्ये आदर्श विद्या मंदिर (Adarsh Vidya Mandir) च्या शिशू वर्गातील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणामध्ये सफाई कर्मचारी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याला अटक करण्यात आली होती. मात्र 23 सप्टेंबर दिवशी त्याचा एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला. आता या प्रकरणामध्ये आरोपीचे वडील अण्णा शिंदे (Anna Shinde) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे. 'आपल्या मुलाचा बनावट एन्काऊंटर मध्ये खून झाल्याचा' त्यांनी दावा केला आहे. वकील अमित कातरनवरे यांच्याकडून शिंदेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अक्षय शिंदे यांच्या आई वडीलांनी PTI वृत्त संस्थेसोबत बोलताना, निष्पक्ष खटल्यानंतर न्यायालयाचा निकाल कुटुंबीयांना मान्य असेल असे ते म्हणाले आहेत. अक्षयने पोलिस कर्मचाऱ्याची बंदूक हिसकावून गोळीबार केल्याच्या पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अण्णा यांनी आम्हाला न्याय हवा आहे असं म्हटलं आहे. 'माझा मुलगा फटाक्यांनाही घाबरत होता. तो पिस्तुल खेचून गोळीबार कसा करू शकेल? ' असा सवाल विचारला आहे. पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे विरूद्ध चार्जशीट दाखल केली आहे. त्याची सुनावणी सुरू होती. 'आम्हांला न्यायालय जो निकाल देईल तो मान्य असणार आहे. पण आम्ही गरीब आहोत आम्हाला आवाज नाही.' पण आता पोलिसांनी आमच्या मुलाला ठार केले आहे.
दरम्यान अक्षय शिंदे च्या मृतदेहाचं काल पोस्टमार्टम झाल्यानंतर आज त्याचं कुटुंब पार्थिव ताब्यात घेऊ शकणार आहेत. नक्की वाचा: Badlapur Sexual Assault: बदलापूर प्रकरणातील आरोपी Akshay Shinde Encounter बाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत.
मुंबई उच्च न्यायालयानेही सरकारला फटकारलं
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं आहे. या प्रकरणातील फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा, अन्यथा आम्हाला वेगळी पावले उचलावी लागतील, असा कडक इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पोलिसांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना गोळी डोक्यात का मारली? जर 3 गोळ्या झाडल्या तर उर्वरित 2 गोळ्या कुठे गेल्या? असा सवालही त्यांनी विचारला आहे. या प्रकारणामध्ये उच्च न्यायालयामध्ये पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे. FIR दाखल करायचा की नाही? याचा निकालही नंतरही दिला जाणार आहे.