Akluj Gram Panchayat Election Result 2021: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर; 'या' पक्षाने मारली बाजी

या निवडणुकीत जनसेवा संघटनेते नेते धवलसिंह मोहिते पाटील (Dhavalsinh Mohite Patil) विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil) अशी लढत पाहायला मिळाली होती.

Picture of Gram Panchayat Alkuj (Photo Credit: Twitter)

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या (Akluj Gram Panchayat Election Result) निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत जनसेवा संघटनेते नेते धवलसिंह मोहिते पाटील (Dhavalsinh Mohite Patil) विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil) अशी लढत पाहायला मिळाली होती. अखेर या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपच्या विजयसिंह पाटील गटाने पुन्हा एकदा अकलूज ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवला आहे. अकलून ही 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. त्यापैकी 1 जागा बिनविरोध झाली होती. उर्वरित 16 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील गटाची सरशी झाली असून त्यांनी 17 पैकी 14 जागा जिंकल्या आहेत.

अकलूज ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून विजयसिंह मोहिते पाटील गटाची एक हाती सत्ता आहे. त्याला विजयसिंहांचे पुतणे धवलसिंह यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीत 17 जागांपैकी 14 जागा भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाला मिळाल्या आहेत. तर, 3 जागांवर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला मिळाल्या आहेत. मोहिते-पाटील यांच्या पॅनलचे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. हे देखील वाचा- Khanapur Gram Panchayat: चंद्रकांत पाटील यांचा किल्ला शिवसेनेने भेदला; खानापूर गावात भाजप हादरला, राष्ट्रवादी, काँग्रेसही पराभूत

कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले?

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (15 जानेवारी) मतदान झाले आहे. राज्यातील एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींवर ही निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकींचा आज निकाल जाहीर होत आहे.