Akhil Chitre: राज ठाकरे यांना धक्का, मनसे इंजिनचा डबा मशालीसोबत धावणार; अखिल चित्रे शिवसेना (UBT) च्या गळाला

पण, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईमध्ये मोठा धक्का दिला आहे.

Akhil Chitre | (Photo credit: archived, edited, representative image)

Maharashtra Assembly Elections 2024: मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे (Akhil Chitre) आणि वरळी येथील शिंदे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत निवसस्थान 'मातोश्री' येथे हा पक्षप्रवेश पार पडला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असे अनेक पक्षप्रवेश वेगवेगळ्या पक्षांमध्ये सध्या पार पडत आहेत.

तृप्ती सावंत यांच्या उमेदवारीवरुन नाराजी

अखिलेश चित्रे हे मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख होतेच. पण, त्यासोबतच ते मनसे टेलिकॉम सेनेचे कार्याध्यक्षही होते. खास करुन त्यांनी अमेझॉनवर मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या लढ्याला यशही आले. त्यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा होती. मात्र, मनसेने ऐनवेळी माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट दिले. ज्यामुळे चित्रे नाराज झाले. विशेष म्हणजे सावंत यांचा पक्षात प्रवेश करवून त्यांना तिकीट देण्यात आले आहे. परिणामी मनसेमध्येही स्थानिक पातळीवर नाराजी पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Shivadi Assembly Constituency: भाजप करणार मनसेचा प्रचार; आशिष शेलार यांची घोषणा)

वरुण सरदेसाई मैदानात

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात होणारी लढत काहीशी तिरंगी आणि विशेष आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी, शिवसेना (UBT) कडून वरुण सरदेसाई, जे आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ मैदानात आहेत. त्यातच मनसेने बाहेरून आलेल्या तृप्ती सावंत यांच्यात लढत होत आहे. सावंत यांच्या उमेदवारीविरोधात चित्रे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. 'माझ्या राजसाहेबांना फसवले जात आहे, गप्प बसणं ह्याला जर काही कमेंट करणारी लोकं राज निष्ठा समजत असतील तर माफी आसावी मी असा राज निष्ठ नाही,' अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. (हेही वाचा, Sharad Pawar यांचे महाराष्ट्र विधानसभा मतदानाच्या तोंडावर संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत? 'आता कोणतीच निवडणूक लढणार नाही' (Watch Video))

निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर

अखिल चित्रे यांच्या पक्षांतराचा मनसेला मोठा फटका बसेल असे मानले जात आहे. पाठिमागील अनेक वर्षांपासून चित्रे हे मनसेसोबत काम करत आहेत. असे असताना विधानसभा निवडणूक सुरु असताना महत्त्वाच्या कार्यकर्त्याची पक्षाला गरज असताना असे पक्षांतर होणे कोणत्याही पक्षासाठी कासे धक्कादायक असते. मनसेसोबही घडल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार ऐन भरात आला आहे. नुकतीच दिवाळी संपली आहे. त्यामुळे दिवाळीतील फटाके संपले असले तरी, राजकीय फटाके मात्र जोरदार फुटत आहेत. आरोप प्रत्यारोप जोरदार सुरु आहेत. 20 तारखेला मतदान आहे तर 23 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif