Akbaruddin Owaisi On Raj Thackeray: अकबरुद्दीन यांनी राज ठाकरेंवर केली अशोभनीय टीका, म्हणाले...

ते म्हणाले की, आज देशात अजान, लिंचिंग आणि हिजाबची चर्चा आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, फक्त मुस्लिमांनी एकत्र उभे राहण्याची गरज आहे.

Akbaruddin Owaisi (Photo Credit - Social Media)

लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा यावरून राज्यात राजकारण सुरू आहे. दरम्यान, AIMIM नेते आणि हैदराबादचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad) झालेल्या सभेत अकबरुद्दीन यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता म्हटले की, "मी इथे कोणाला उत्तर द्यायला आलेलो नाही, कोणावर वाईट बोलायला आलो नाही. मला कोणाला उत्तर द्यायचे नाही. माझ्याकडे खासदार आहे. आणि तुम्ही.. तू बेघर आहेस, बेपत्ता आहेस, तुझ्याच घरातून बेदखल झाला आहेस. मी म्हणेन जे भुंकतात त्यांना भुंकू द्या." अकबरुद्दीन ओवेसी इथेच थांबले नाहीत. पुढे म्हणाले की कुत्र्यांना भुंकू द्या, आम्ही सिंह आहोत त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांच्या फंदात पडू नका… तुम्ही काहीही म्हणा, फक्त हसत राहा आणि तुमचे काम करत रहा.

अकबरुद्दीन ओवेसी पुढे म्हणाले की, देशात द्वेषाची चर्चा होत आहे, मात्र द्वेषाने नाही तर प्रेमाने उत्तर देणार आहे. ते म्हणाले की, आज देशात अजान, लिंचिंग आणि हिजाबची चर्चा आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, फक्त मुस्लिमांनी एकत्र उभे राहण्याची गरज आहे.

अकबरुद्दीन औरंगजेबाच्या समाधीला दिली भेट

तत्पूर्वी अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलदाबाद येथील औरंगजेबाच्या समाधीला भेट देऊन पुष्प अर्पण केले. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार वारिस पठाण होते. स्कूल ऑफ एक्सलन्सच्या पायाभरणीसाठी आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबादेत आले होते. (हे देखील वाचा: Sanjay Raut On Owaisi: संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल, औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं, त्यांनाही याच मातीत गाडू)

अकबरुद्दीनला वाद निर्माण करायचा आहे : चंद्रकांत खैरे

माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अकबरुद्दीन यांच्यावर राजकीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. ते म्हणाला की कोणीही हिंदू किंवा मुस्लिम त्या थडग्याला भेट देणार नाही कारण औरंगजेब सर्वात क्रूर मुघल सम्राट होता. मात्र ओवेसी आणि त्यांच्या पक्षाचे नेते राजकीय फायद्यासाठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र, त्याचा बचाव करताना खासदार इम्तियाज म्हणाले की, "आमचे नेते हैद्राबादहून आले आहेत आणि औरंगाबादमध्ये मोफत शाळा सुरू करत आहेत जी कोणत्याही विशिष्ट समाजासाठी नाही, तर इथल्या सर्व मुलांना मोफत शिक्षण मिळेल. आज त्याची पायाभरणी झाली. घातली होती. घातली होती."