Baramati Lok Sabha Constituency: 'जरा दम धरा.. थोडा राहू सस्पेन्स देत', अजित पवार यांचा प्रसारमाध्यमांना सल्ला

त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात ते कोणता उमेदवार देता याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

Ajit Pawar | (Photo Credit - X)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) मिळवला तेव्हापासून बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) जोरदार चर्चेत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात ते कोणता उमेदवार देता याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अर्थात पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी विचारले असता, 'जरा दम धरा.. थोडा सस्पेन्स राहू द्या, योग्य वेळी तुम्हाला सर्व माहिती होईल', असा सल्ला अजित पवार यांनी नेहमीच्या स्टाईलने प्रसारमाध्यमांना दिला. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत विचारले असता उदयनराजे भोसले यांना समजावण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची असल्याचे ते म्हणाले. शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, या वेळी ते बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले, रायगडची उमेदवारी आज आम्ही जाहीर केली आहे. या ठिकाणी विद्यमान खासदार सुनिल तटकरे निवडणूक लढतील. शिरुर येथूनही उमेदवार जाहीर होईल. पण बारामतीबाबत थोडा सस्पेन्स राहू द्या. येत्या 28 तारखेला आम्ही महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन. त्यात सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. तोपर्यंत जरा दम धरा.. थोडा सस्पेन्स राहू द्या, असे अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut on Prakash Ambedkar: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर निरंतर चर्चा करावे असे व्यक्तीमत्व- संजय राऊत)

सातार येथून उदयनराजे भोसले यांनी शड्डू ठोकला आहे. पुन्हा एकदा लोकसभा उमेदवारीसाठी ते इच्छुक आहेत, याबातब विचारले असता त्याबाबत आपण काही बोलणार नाही. त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची असल्याचे अजित पवार म्हणाले. याच वेळी बारामती येथून विजय शिवतारे अधिक सक्रीय झाल्याच्या पार्श्वभूमीवर विचारले असता ते म्हणाले, मी त्यांच्याबाबत काहीच बोलणार नाही. माझा कोणावरही आक्षेप नाही. मी विकासाचे राजकारण करत असतो असे अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut on Mahayuti: 'गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात', संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे, अजित पवार गटावर टीका)

दरम्यान, महायुतीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद असल्याच्या चर्चा आहेत. यावर विचारले असता अजित पवार म्हणाले, महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. सर्वजण विचारपूर्वक निर्णय घेत आहेत. आमच्यात काही वाद नसताना आणि अधिकृतरित्या कोणतीही माहिती कोणीही दिली नसताना उगाचच या पक्षला येवढ्या जागा आणि त्या पक्षाला तेवढ्या जागा अशा बातम्या दिल्या जात आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. येत्या 28 मार्च रोजी महायुती संयुक्तरित्या एक पत्रकार परिषद घेईल. त्यामध्ये सर्व जागांबाबत माहिती दिली जाईल, असेही ते म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif