Ajit Pawar NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईतील 7 जागा लढवण्याचा प्रस्ताव ठेवणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये मुंबादेवी, भायखळा, अनुशक्तीनगर, चेंबूर, मानखुर्द- शिवाजीनगर, वांद्रे पूर्व आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघ लढण्यासाठी इच्छुक आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP Ajit Pawar) सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये मुंबादेवी, भायखळा, अनुशक्तीनगर, चेंबूर, मानखुर्द- शिवाजीनगर, वांद्रे पूर्व आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघ लढण्यासाठी इच्छुक आहे. एबीपी माझाने या संदर्भातली बातमी दिली आहे. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार इच्छुक, भायखळा- समीर भुजबळ, अनुशक्ती नगर- सना मलिक, मानखुर्द शिवाजीनगर- नवाब मलिक, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ- झीशान सिद्धकी हे इच्छूक असल्याचे समजत आहे. (हेही वाचा - Ajit pawar Jan Sanman Melava: अजित पवारांचे बारामतीमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन; राज्यव्यापी जनसन्मान मेळाव्याचे आयोजन)
माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आतापर्यंत सव्वा कोटी मायमाऊलींच्या बँक खात्यात दोन महिन्यांची रक्कम जमा झाली आहे. याव्यतिरिक्त मुलींच्या उच्च शिक्षणाचा 100 टक्के खर्च सरकार उचलणार आहे. 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत आम्ही देत आहोत. त्याचप्रमाणे माझ्या शेतकरी बांधवांना वीजबिल माफ केलं आहे. असे यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले आहे.
महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी अजित पवारांनी केले. आम्ही शिवाजी-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. जे करू ते महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी करू. असे ते यावेळी म्हटले.
अजित पवार म्हणाले, नुकताच मी जो राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, त्यातून सर्व समाजघटकाला आम्ही काय दिलं, कोणकोणत्या अभिनव योजना देऊ केल्या, त्या सगळ्याची माहिती देण्यासाठी आम्ही ही जन सन्मान यात्रा काढली आहे. आधीचं सरकार असो, आताचं सरकार असो.. मी तेव्हाही अर्थमंत्री होतो आणि आताही अर्थमंत्री आहे. राज्याच्या विकासासाठी मी कधी निधी कमी पडू दिला नाही.