Ajit Pawar on Amol Kolhe: अजित पवार गटाचा शिरुर लोकसभा मतदारसंघावर दावा, अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार उतरवणार

तसेच, शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency) आपण उमेदवार देणार आणि तो निवडून आणणार असे थेट आव्हानही दिले आहे.

Ajit Pawar | Twitter

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर नाव न घेता थेट हल्ला केला आहे. तसेच, शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency) आपण उमेदवार देणार आणि तो निवडून आणणार असे थेट आव्हानही दिले आहे. अमोल कोल्हे यांच्यावर टीका करतानाच अजित पवार यांनी थेट शरद पवार यांनाही टोला लगावला आहे. त्यामुळे अजित पवार सध्या आक्रमक असल्याचे पाहायला मिळते आहे. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांनाही इलेक्शन मोडमध्ये घेऊन जाण्याची तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये एका खासदाराला निवडूण येण्यासाठी मी स्वत: आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रयत्न केले. त्याला निवडूनही आणला. मात्र, आता त्याच्या विरोधात उमेदवार देणार आणि तो निवडूनही आणणार आहे.

शरद पवार यांना टोला

शरद पवार यांच्यावर टीका करताना अजित पवार यांनी म्हटले आहे की, अनेकांनी वयाच्या 38 व्या वर्षीच वेगळे निर्णय घेतले. आम्हाला निर्णय घेण्यासाठी साठ वर्षे व्हावी लागली. आम्ही उगाचच असे निर्णय घेतले नाहीत. या आधी आम्ही अनेकदा थांबा आम्हाला काम करु द्या असे म्हटले होते. मात्र, तसे घडले नाही. आम्हाला निर्णयच घ्यावा लागला. माझी सर्वांनाच विनंती आहे. बाबांनो, ज्यांना माझ्या बाजूने यायचं आहे त्यांनी माझ्या बाजूने या. ज्यांना नाही यायचं त्यांनी तिकडे जा. पण, निर्णय घ्या. उगाचच दुटप्पी भूमिका घेऊ नका. मेहेरबाणी करा.. जे खरं बोलतो तेच सांगा. (हेही वाचा -Nawab Malik Joins Ajit Pawar's Group: शरद पवारांना मोठा धक्का! माजी मंत्री नवाब मलिक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात सामील)

कार्यकर्त्यांना इशारा

दरम्यान, कार्यकर्ते अद्यापही दोन्ही बाजूला दिसतात, याकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधले असता अजित पवार म्हणाले, असूद्या.. मी त्यांना सांगायचे काम केले आहे. ज्यांना माझ्या बाजूने राहायचे आहे ते माझ्या बाजूने राहतील. ज्यांना नाही रायचे आहे ते तिकडे जातील. मी सांगितल आहे. पाहू काय फरक दिसतो आहे काय. मला माझी भूमिका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे इतरांनी मला टोकण्याचे कारण नाही. (हेही वाचा -Devendra Fadanvis On Nawab Malik In Mahayuti: 'पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…' आमदार नवाब मलिक महायुतीमध्ये नको; फडणवीसांचे अजित दादांना जाहीर पत्र)

एक खासदार आहे. त्याला निवडूण आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचे रान केले. त्याला निवडून आणला पण त्याला दीड वर्षांपासून राजीनामाच द्यायचा आहे. तो म्हणतो मी कलाकार आहे. मी काढलेला सिनेमा चालला नाही. त्याचा माझ्या प्रपंच्यावर परिणाम होतो. पण, खरे तर तो मतदारसंघातच फिरकला नाही. आता आम्ही ती जागा लढवणार आहे आणि निवडूणही आणणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif