Ajit Pawar On Eknath Shinde: तुम्ही काम करत नाही केवळ दाडी कुरवाळत बसतात, काम करा मी कौतुक करेल; अजित पवारांचा एकनाथ शिंदेना टोला
महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येतं आहे. धाराशिव मध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली. एका डॉक्टरचा व्हिडिओ समोर आला आहे. नेमकं काय झालं आहे समोर यायला हवं, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Ajit Pawar On Eknath Shinde: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जहरी टीका केली आहे. तुम्ही काम करत नाही केवळ दाडी कुरवाळत बसतात, काम करा मी कौतुक करेल, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. राज्यात दंगल का घडतेय? त्याचा मास्टर माईंड शोधून काढला पाहिजे. महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येतं आहे. धाराशिव मध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली. एका डॉक्टरचा व्हिडिओ समोर आला आहे. नेमकं काय झालं आहे समोर यायला हवं, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, आज विधानभवनमध्ये कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. आता गाड्यांवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिसतात. यांना आम्हाला बघायचं नाही तरी का ते दाखवता ? मला विधानभवनला बोलवलं होत परंतु मी गेलो नाही. झिरवळ यांना विचारल का गेला नाही? तर म्हणाले पोट वाढलं आहे. योगा करता येणार नाही अडचण होईल. झिरवाळ खरे बोलले मात्र बायकोला खांद्यावर घेऊन नाचले. (हेही वाचा -Maharashtra Politics: वर्षभरापूर्वी बंड यशस्वी झाले नसते तर एकनाथ शिंदेंनी गोळी झाडून घेतली असती; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा)
पुण्यात कोयता गँग त्रास वाढला आहे. पोलिस यंत्रणा चांगली आहे. परंतु, सरकार कमी पडत आहे. पोलिसांच्या कामात हस्तक्षेप वाढत आहे. हे शोभणारं नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. (वाचा - Satara News: खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आमनेसामने; सातारा येथे तणाव)
दरम्यान, अजित पवार यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की, फक्त भाषण केल्याने पहिला नंबर येणार नाही. परंतु, बोलणाऱ्यानी स्वतः काम करायला हवे. पक्षाने लहानात लहान कार्यकर्त्याला संधी दिली. अनेकजण मंत्री होतात परंतु स्वतः व्यतिरिक्त इतर आमदार निवडून आणू शकत नाही. त्यांनी काम करायला हवं, असा सल्लाही अजित पवारांनी दिला आहे.