Ajit Pawar Clarify Statement: भाजप शिवसेनेशी हातमिळवणी का केली? अजित पवार यांचे 'एक्स' हँडलवर पत्रासह स्पष्टीकरण
भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shiv Sena) यांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा नवे स्पष्टीकरण दिले आहे.
भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shiv Sena) यांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा नवे स्पष्टीकरण दिले आहे. काल (रविवारी, 25 फेब्रुवारी) रोजी काल रात्री त्यांच्या 'एक्स' हँडलवर एक निवेदन (Ajit Pawar Clarify Statemen जारी केले. ज्यामध्ये विविध प्रश्नांची भूमिका स्पष्ट केली आहे.
मोदी, शाहा यांची कार्यशैली आवडली
अजित पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विचार आणि उद्दिष्टाशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे पूर्ण करण्याची माझी भूमिका आहे. पंतप्रधान मोदी आणि केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली या देशात होत असलेली विकासकामे मला महत्त्वाची वाटली. मला त्यांच्यातील चोख नेतृत्व आणि योग्य निर्णय प्रक्रिया हे गुण आवडले. माझी कार्यशैली आणि त्यांची कार्यशैली सारखीच आहे. मोठ्यांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नाही. (हेही वाचा, Ajit Pawar यांचे सख्खे पुतणे Yugendra Pawar बारामती मध्ये दिसणार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात; आज शरद पवारांच्या कार्यालयाला भेट!)
अजित पवार यांचे आत्मनिवेदन
पाठीमागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप आणि शिवसेना यांच्यासोबत जाण्याचा वेगळा विचार केला. याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारची चर्चा होत आहे. याबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे. ती राज्यातील सन्मानीय नागरिकांपर्यंत पोहोचावी याबाबत हे पत्र लिहीत आहे. सन 1991 पासून मी राजकीय जीवनात वाटचाल करत आहे. राजकारणात मला अनेक पदे मिळाली. मला ही पदे कोणी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरतंर राजकारणात मी अपघाताने आलो. पक्षाला एका युवा नेत्याची आवश्यकता होती. त्यामुळे कुटुंबीयानी मला संधी दिली. या संधीचे मी सोने केले. त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला. पण अलिकडे मला लक्षात आले केवळ संधी मिळून उपयोग नाही. लोकांची कामे पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल, यावर माझा नेहमीच भर राहिला. पहाटे पाच वाजलेपासून काम करण्याची सवय लावून घेतली. (हेही वाचा, Ajit Pawar Faction Moves Bombay HC: अजित पवार गटाची मुंबई उच्च न्यायालयात धाव; शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या सभापतींच्या निर्णयाला दिले आव्हान)
एक्स पोस्ट
नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील विकास भावला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देशाचा जो विकास होतो आहे तो मला महत्त्वाचा वाटला. कणखर नेतृत्व आणि योग्य निर्णयप्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले. त्यांची आणि माझी कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे. कामावर आमचे जास्त प्रेम आहे. त्यांच्यामवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्याला विकासात अग्रेसकर कसे करता येईल, या उद्देशाने मी ही भूमिका स्वीकारली आहे.