Female Arrested for Air India Pilot impersonation: एअर इंडिया तोतया महिला पायलटला अटक, एकास 27 लाख रुपयांना गंडा
शारदी शशिकांत (Shardi Shashikant) या 35 वर्षीय महिलेस पोलिसांनी अटक (Fake Female Pilot) केली आहे. तिच्यावर तोतयागिरी (Impersonation) आणि फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप आहे. तिने एअर इंडिया (Air India) कंपनीत पायलट (Impersonate Woman Pilot ) असल्याचे सांगून स्वत:च्या वडिलांच्या सहकाऱ्यास तब्बल 27 लाख रुपयांचा कथीत गंडा घातल्याचे वृत्त आहे.
शारदी शशिकांत (Shardi Shashikant) या 35 वर्षीय महिलेस पोलिसांनी अटक (Fake Female Pilot) केली आहे. तिच्यावर तोतयागिरी (Impersonation) आणि फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप आहे. तिने एअर इंडिया (Air India) कंपनीत पायलट (Impersonate Female Pilot ) असल्याचे सांगून स्वत:च्या वडिलांच्या सहकाऱ्यास तब्बल 27 लाख रुपयांचा कथीत गंडा घातल्याचे वृत्त आहे. सदर महिला नेहमी पायलटचा गणवेश परिधान करत असे. तसेच, आपली अनेक ठिकाणी ओळख असून, तुमच्या मुलांना पायलट ट्रेनिंग स्कूल (Pilot Training School) मध्ये प्रवेश आणि पायलटची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत ती अनेकांकडून पैसे उकळत असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये पुढे आले आहे.
फसवणूक कशी उघडकीस आली?
चेंबूर येथील रहिवासी असलेली शारदी ही पायलटच्या गणवेशात फिरायची आणि एअर इंडियामध्ये पायलट असल्याबद्दल स्वत:च्याच आई-वडिलांशी खोटं बोलायची. तिने तिच्या पीडितांना पटवून देण्यासाठी एअर इंडियाच्या ईमेल पत्त्यावरून बनावट पेमेंट इनव्हॉइसही जारी केल्या. तक्रारदाराच्या मुलाने नुकतेच विज्ञान शाखेत 12वीचे शिक्षण पूर्ण केले होते. दरम्यानच्या काळात तो शारदीला भेटला. या भेटीदरम्यान झालेल्या संवादामध्ये आरोपी महिलेने तक्रारदारास आपण एअर इंडियामध्ये पायलट असल्याचा दावा केला आणि ती त्याच्या मुलाला पायलट म्हणून करिअर करण्यासाठी मदत करू शकते, असा विश्वास दिला. मुलाचे करिअर घडले या हेतूने तक्रारदार आरोपी महिलेच्या जाळ्यात ओढला गेला. (हेही वाचा, Bomb Threat to Air India Flight: कोचीन विमानतळावरुन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; आरोपी अटकेत)
आर्थिक व्यवहार
शारदी हिने तक्रारदारास प्रवेश शुल्क आणि अभ्यासक्रमाच्या खर्चाविषयी तपशीलवार माहिती दिली. या माहितीमध्ये तिने असा दावा केला की, पायलट होण्यासाठी एकूण संभाव्य खर्च विविध सवलतींसह सुमारे 50 लाख ते 52 लाख रुपये असेल. तक्रारदाराने या खर्चापैकी 26.81 लाख रुपये आरटीजीएसद्वारे तिने दिलेल्या विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी तिने त्याला ईमेलद्वारे पावत्या पाठवल्या.
संशय आणि अटक
पैसे तर पाठवले. पण, प्रदीर्घ काळ उलटूनही प्रवेश प्रक्रियेत कोणतीही प्रगती नसल्याने तक्रारदाराला संशय आला आणि त्यांनी चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान त्याला कळले की, शारदी ही वैमानिक नाही. ती केवळ पायलटचा गणवेश घालून तिच्या आईवडिलांची दिशाभूल करत असल्याचे त्याला आढळले. त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांमध्ये तक्रार दिली. दरम्यान, पोलिसांनी तिला बोलावले असता, ती अंबरनाथला जाऊन वारंवार मोबाईल नंबर बदलून त्यांना टाळत होती.
आरोप आणि तपास
शारदी शशिकांत या महिलेवर फसवणूक आणि फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तिचा हेतू आणि फसवणूक केलेल्या पैशाचा नेमका वापर करण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार यांनी सांगितले की, “आम्ही तिला तिच्या अंबरनाथ येथील घरातून अटक केली. न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिने तक्रारदाराच्या पैशाचे काय केले हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ती कोणत्याही विमान कंपनीशी संबंधित नसल्याचेही आम्हाला आढळले. वडिलांच्या सहकाऱ्याला मूर्ख बनवण्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी आम्ही तिची चौकशी करत आहोत.''
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)