Heart Transplant: 39 वर्षीय भारतीय लष्करातील जवानासाठी एयर फोर्सच्या विमानाचा नागपूर-पुणे प्रवास; हृदय प्रत्यारोपण यशस्वी
दता ही गृहिणी होती तर ज्याला हे हृदय दान करण्यात आले तो 39 वर्षीय भारतीय लष्करातील जवान होता.
हवाई दलाच्या जवानाच्या हृदय प्रत्यारोपणासाठी 26 जुलैला एक मानवी हृद्य नागपूर वरून पुण्यात आणण्यात आले. यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला होता. पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस (AICTS) येथे हवाई दलाच्या जवानाच्या हृदय प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. यासाठी भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाचा वापर करण्यात आला होता.
ABP च्या वृत्तानुसार, नागपूर ते पुणे असा हृद्याला एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी नेण्याला सुमारे 90 मिनिटांचा वेळ लागला. यामध्ये हृद्याचे डोनेशन करणारी ही 31 वर्षीय महिला होती. ब्रेन डेड झालेल्या या महिलेचं हृद्य अवदान करण्यासाठी झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर नागपूरचे समन्वयक दिनेश मंडपे यांनी संपर्क साधला होता.
ब्रेन डेड महिलेच्या कुटुंबाने संमती दिल्यानंतर हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंड दान करण्यात आले. पुण्यात एक तर नागपुरात तीन अवयव दान करण्यात आले.
इंडियन आर्मीने यामध्ये ट्वीट करत माहिती दिली आहे. दता ही गृहिणी होती तर ज्याला हे हृदय दान करण्यात आले तो 39 वर्षीय भारतीय लष्करातील जवान होता.