Ahmednagar Crime News: श्रीगोंदा नगर पालिका माजी महिला नगराध्यांची आत्महत्या, गळफास लावून संपवले जीवन
राहत्या घरात पाहटेच्या सुमारास श्यामला ताडे यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला त्यावरुन त्यांनी आत्महत्या (Suicide) केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रींगोदा नगर पालिका (Shrigonda Municipal Council) माजी नगराध्यक्षा नगराध्यक्षा श्यामला मनोज ताडे (वय 40) यांचे निधन झाले आहे. राहत्या घरात पाहटेच्या सुमारास श्यामला ताडे यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला त्यावरुन त्यांनी आत्महत्या (Suicide) केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. ताडे अलिकडील काही काळात राजकारणात फारशा सक्रीय नव्हत्या. त्यांनी कौटुंबीक कारणातून टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु आहे. पूर्ण तपासानंतरच श्यामला ताडे यांच्या मृत्यूचे कारण समजू शकणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी (20 डिसेंबर) सकाळी श्यामलाताडे यांचा मृतदेह राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पंख्याला साडी बांधून त्यांनी गळफास घेतला. दरम्यान, शामला ताडे यांच्या मृत्यूबाबत दगडू ताडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याला माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच पंचनामा करुन श्यामला यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला. डॉक्टरांनी श्यामला यांना मृत घोषीत केले. (हेही वाचा Haryana Crime: हरियाणामध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीवर झाडल्या गोळ्या, आरोपी अटकेत)
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून श्यामला ताडे यांनी अडीच वर्षे पदभार सांभाळला होता. नगराध्यक्ष पद महिला अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते त्या वेळी दहावर्षांपूर्वी त्यांना नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. आरक्षीत जागेवरुन त्या निवडून आल्या होत्या. दरम्यान, अलिकडील काही काळात श्यामला ताडे आणि त्यांचे पतीही राजकारणात फारसे सक्रीय नव्हते. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे.