Ahmednagar News: अभियंताने घेतली 1 कोटी रुपयाचीं लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दोघांना अटक, अहमदनगर येथील घटना
अहमदनगर येथे शुक्रवारी उघडकीस आली.
Ahmednagar News: दिवसेंदिवस लाच घेतल्याची घटना वाढत चालली आहे. दरम्यान एका सहाय्यक अभियतांने 1 कोटी रुपयांची लाच घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील आता पर्यंतची सर्वांत मोठी कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.अहमदनगर येथे शुक्रवारी रात्री नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच अभियंत्याला अटक केली आहे. या घटनेची नोंद अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक अभियंता लाच घेत असल्याची माहिती लाचलुचपत विभागाकडे देण्यात आली होती.
नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस शर्मिष्ठा वाल्हवरकर यांच्या पथकांच्या मदतीने ही घटना समोर आली आहे. लाचखोर अभियंत्याला पोलिसांनी अटक केले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाज या व्यक्तीवर लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने 100 mm व्यासाचे पाईप टाकण्याचे काम केले होते. या कामाचे तब्बल 2 कोटी रुपयांचे बिल झाले होते. दरम्यान या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचे बिल आउटवर्ड वर घेऊन तत्कालीन अभियंताची सही घेण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याने फिर्यादी ठेकेदार याच्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती.
लाच घेतल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. अभियंता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अमित गायकवाड यांना लाच घेताना पकडले. या घटनेत आणखी एकाचा वाटा असल्याचा आरोपीने सांगितले.