मुंबई - पुणे रेल्वे मार्गावर प्रगती एक्सप्रेस सह लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं वेळापत्रक 16-20 ऑक्टोबर दरम्यान कोलमडणार; जाणून घ्या कोणत्या गाड्या झाल्या रद्द

परिणामी प्रवासी आणि नोकरदार मुंबई, पुणेकरांना त्याचा फटका बसणार आहे.

Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

मंबई -पुणे दरम्यान कर्जत, मंकी हिल घाटामध्ये रूळांच्या दुरूस्तीच्या कामामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान कोलमडणार आहे. आज (15 ऑक्टोबर) पासून पुढील 10 दिवस मुंबई - पुणे रेल्वे सेवेसोबतच या मार्गावरून पंढरपूर, भुसावळ, नांदेड या भागात जाणार्‍या गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडणार आहे. परिणामी प्रवासी आणि नोकरदार मुंबई, पुणेकरांना त्याचा फटका बसणार आहे. रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नियमात बदल, जाणून घ्या कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये स्विकारणार.  

रेल्वे रूळाच्या कामाच्या वेळेस पुणे - मुंबई - पुणे धावणारी प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नियमित मुंबई - पुणे प्रवास करणार्‍यांनी या काळात प्रवासाचं नियोजन करताना काळजी घ्यावी अशी असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आली आहे. या काळात आरक्षण करून प्रवास करणार्‍यांचे हाल होण्याची शक्यता आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्ववत होण्यासाठी 10 दिवसांचा वेळ लागू शकतो अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रद्द झालेल्या आणि वेळापत्रक बदललेल्या गाड्या कोणत्या?

महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबरला 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक 2019 पार पडणार आहे. यासाठी राज्यात अनेक मतदार आपल्या मूळगावी जाणार आहे. त्यामुळे तुम्हीही या काळात गावी जाणार असाल तर प्रवासाची सोय बघूनच बाहेर पडा.