Lok Sabha Elections: नरेंद्र मोदी यांच्या मुंबई मधील सभेच्या पार्श्वभूमीवर BKC परिसरात वाहतूक वळवली; बदल पाहून बाहेर पडण्याचं Mumbai Traffic Police विभागाचं आवाहन

त्यामुळे वांद्रे कुर्ला संकुल (परिसरामध्ये मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक वळवली आहे

Modi Rally in Mumbai |Image used for representational purpose | (Photo Credits: PTI/ANI)

26 April BKC Traffic Diversions: महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूकीचा (Lok Sabha Elections) प्रचार सध्या शिखरावर आहे. 29 एप्रिलला मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रामध्ये 17 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. आज नाशिकमध्ये  राज ठाकरे, संगमनेरमध्ये राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत. तर मुंबईमध्ये भाजपा-शिवसेनेच्या युतीची सभा होणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray)  नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईकरांना संबोधित करणार आहेत. मुंबईच्या बीकेसी (BKC) परिसरामध्ये आज ही सभा होणार आहे. त्यामुळे वांद्रे कुर्ला संकुल (Bandra Kurla Complex) परिसरामध्ये मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) वाहतूक वळवली आहे. लोकसभा निवडणूक 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची संगमनेर येथे आज सभा

कसे असेल बीकेसी परिसरातील वाहतूक नियमन?

एमएमआरडीए परिसरात वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत.  बांद्रा कुर्ला परिसरातील ट्राफिक विभागाने याबाबत खास सर्क्युलर जारी केलं आहे.

वाहतूकीचे हे नियम इतर सार्‍या वाहनांना लागू असल्याने वाहतूकीच्या नियमांमधील हे बदल लक्षात घेऊन मुंबईकरांना आज प्लॅनिंग करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

आज नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदार संघातून त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. NDA च्या अनेक नेत्यांसह आज उद्धव ठाकरे वाराणसीमध्ये मोदींच्या सोबत असतील. संध्याकाळी ते मुंबईतील सभेला संबोधित करतील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif