महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या मतदानासाठी 'नवमतदार नोंदणी', मतदार यादीमध्ये Online आणि Offline माध्यमातून नाव कसं नोंदवाल?
यंदा 4 ऑक्टोबरपर्यंत तुम्हांला मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याची संधी आहे.
Registration for New Electoral: महाराष्ट्रामध्ये येत्या 21 ऑक्टोबर दिवशी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान (Maharashtra Vidhan Sabha Elections) होणार आहे. राज्याचा आगामी मुख्यमंत्री निवडण्यासाठी ही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे मतदानाची जबाबदारी पार पाडून लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर तुमचं नाव मतदार यादीमध्ये असणं आवश्यक आहे. यंदा 4 ऑक्टोबरपर्यंत तुम्हांला मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याची संधी आहे. त्यामुळे आजच तुमच्या मतदार संघानुसार यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही? हे नक्की तपासून पहा. नाव नसल्यास ते ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने रजिस्टर करण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यासाठी www.nvsp.in तुम्हांला भेट दिल्यास सारी माहिती उपलब्ध होणार आहे. मग पहा नवमतदार आणि मतदार यादीमध्ये नाव नसल्यास घरबसल्या नाव नोंदणी कशी कराल? Maharashtra Assembly Elections 2019: मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल, जाणून घ्या सोप्प्या स्टेप्स
मतदार यादीमध्ये घरबसल्या ऑनलाईन नाव नोंदणी कशी कराल?
- निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या वेबसाईटला भेट द्या.
- तुम्हांला या वेबसाईटवर पहिल्यांदा ऑनलाईन माध्यमातून काही अपडेट्स करत असाल तर साईन अप करून रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुम्ही यापूर्वी अकाऊंट बनवलेले असेल तर केवळ लॉन ईन करावं लागेल.
- मतदार यादीत तुमचे नाव नसल्यास तुम्ही www.nvsp.in या वेबसाईटवर डाव्या बाजूला असलेल्या Registration for New Electoral या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर नाव, जन्मतारीख, पत्ता, आवश्यक कागदपत्र ऑनलाईन माध्यमातून अपलोड करा.
- त्यानंतर तुम्हांला एक ट्रॅकिंग आयडी मिळेल. ज्याद्वारा तुम्ही तुमच्या अर्जाची प्रक्रिया कोणत्या टप्प्यात आहे? हे पाहू शकता.
ऑफलाईन मतदार नोंदणी कशी कराल?
ऑनलाईन प्रमाणेच नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी Form 6 उपलब्ध असतो. तो भरून आवश्यक कागदपत्रांसोबत नजिकच्या कार्यालयात सादर केल्यास तुमचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं.
डिजिटल बनत चाललेल्या भारतामध्ये आता निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मदतीसाठी 1950 ही हेल्पलाईन 24 तास सेवेसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. तक्रार नोंदवण्यासाठी ceo.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध आहे. तसेच मोबाईल अॅप देखील उपलब्ध आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाखाहून अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे.