लोकसभा निवडणूक निकाल जाहीर, आता लवकरच महाराष्ट्र बोर्ड SSC, HSC निकाल 2019 ची तारीख समजणार; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता
शिक्षण मंडळ आणि काही तज्ञांच्या अंदाजानुसार दहावी 2019 चा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक निकाल 2019 हाती आले आहेत. एनडीए सरकारच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला आहे. आता महाराष्ट्रामध्ये एसएससी आणि एचएससीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम निकालाच्या तारखेचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणूकीच्या कामकाजामध्ये शिक्षकांना इलेक्शन ड्युडीची कामं असल्याने त्याचा परिणाम निकालांवर होईल अशी भीती विद्यार्थी आणि पालकांच्या मनात होती. मात्र शिक्षण मंडळाने दिलासा देत दहावी आणि बारावीचे निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या आत लावले जातील असे सांगितले आहे. (हेही वाचा-अकरावी प्रवेशासाठी पुढील वर्षी इन हाऊस कोट्याला कात्री, आरक्षण 103% वर गेल्याने शासनाचा निर्णय)
दहावी बारावी निकाल 2019
शिक्षण मंडळ आणि काही तज्ञांच्या अंदाजानुसार दहावी 2019 चा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. अद्याप शिक्षण मंडळाकडून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दहावी, बारावीचा निकाल ऑनलाईन माध्यमातून जाहीर करण्यात येणार आहे.
कुठे पहाल निकाल ?
- mahresults.nic.in,
- maharashtraeducation.com, results.mkcl.org,
- mahahsscboard.maharashtra.gov.in,
- mahahsscboard.in
देशामध्ये अनेक राज्यांमध्ये बोर्ड निकाल जाहीर झाले आहेत. त्यासोबतच ICSE आणि CBSE निकालही जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे अॅडमिशन प्रक्रियेमध्ये आरक्षणासोबतच हाय कट ऑफमुळे अॅडमिशन इच्छित कॉलेजमध्ये मिळणार का? याची धास्तीदेखील विद्यार्थ्यांच्या मनात कायम आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)