Ahamdanagar Accident: नगरमध्ये आळंदीकडे जाणाऱ्या पालखीत शिरला कंटेनर, 2 भाविकांचा मृत्यू

दरम्यान ट्रक चालकाला डूलकी लागल्याने त्याचा ट्रक वरील ताबा सुटला व हा ट्रक या दिंडीमध्ये घुसला.

Accident (PC - File Photo)

अहमदनगरच्या शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या पालखीमध्ये कंटेनर घुसल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारानजीक घटली आहे. या भीषण अपघातात 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक पुणे महामार्गावर हा अपघात घडला असून हा अपघात भीषण असल्याने हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी अपघातस्थळी धाव घेतली.  (हेही वाचा - Villager Killed By Naxalites In Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून गावकऱ्याची हत्या)

शिर्डी येथील श्री महंत काशीकानंद महाराज यांची साई पालखी दिंडी देवाची आळंदी येथे जात होती . दरम्यान ट्रक चालकाला डूलकी लागल्याने त्याचा ट्रक वरील ताबा सुटला व हा ट्रक या दिंडीमध्ये घुसला. यामुळे दोन वारकरी जागीच ठार झाले तर नऊ वारकरी जखमी झाले. घारगाव येथील नांदूर खंदरमाळ फाटा सातवा मैल येथे झालेल्या अपघातातील जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचं प्रशासनाला केल्या असून तातडीने मदत पोहोचवली आहे