Agricultural Festival 2023: औरंगाबाद जिल्ह्यात 1 ते 5 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन, जाणून घ्या काय आहे खास

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील विविध कृषी दालनांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतीतील नवतंत्रज्ञान, नवे प्रयोग याविषयी शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली तसेच शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या नव्या प्रयोगांचे कौतुकही केले.

Agricultural Festival 2023 (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आज उद्घाटन झाले. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोड येथील महाराणा प्रतापसिंह चौक परिसरात येत्या 1 जानेवारी ते 5 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कृषीमहोत्सवाच्या नावाने पैसे गोळा केल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांच्यावर झाला होता. विरोधकांच्या विरोधानंतर आज या महोत्सवाला सुरुवात झाली. या प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील विविध कृषी दालनांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतीतील नवतंत्रज्ञान, नवे प्रयोग याविषयी शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली तसेच शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या नव्या प्रयोगांचे कौतुकही केले. (हेही वाचा: नवी-मुंबई मेट्रो प्रकल्पातील सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्थानकांदरम्यान मेट्रोची ट्रायल रन यशस्वी)

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये -

  • 600 पेक्षा जास्त स्टॉल्स
  • 99 विविध प्रात्यक्षिके
  • आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
  • शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरण
  • यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा
  • 32 विविध चर्चासत्रे
  • आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे राज्यस्तरीय उद्घाटन

 विशेष सहभाग -

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
  • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला
  • महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळ, मुंबईयाबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत सांगितले की, 'राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीपद्धतीकडे वळावे तसेच कृषी क्षेत्रात सुरू असलेले अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग व बदल त्यांच्यापर्यंत पोहचावेत यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन कृषी क्षेत्रातील अनेक नवीन संकल्पना जाणून घेतल्या.' ते पुढे म्हणतात, 'संपूर्णपणे वेगळ्या रंगाच्या कापसापासून तयार केलेला कोट यासमयी एका शेतकऱ्याने मला परिधान करण्यास दिला. तसेच शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून जास्त उत्पादन घेण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या नवीन कल्पनांची माहिती देखील यावेळी जाणून घेतली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यादृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांनीही तृणधान्याची अधिकाधिक लागवड करावी यासाठी या कृषी प्रदर्शनात भर देण्यात आला होता.'

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement