Pune: शरद पवारांच्या मेट्रो ट्रायलनंतर चंद्रकांत पाटलांचा सवाल, मेट्रो कंपनीवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार
शरद पवार यांनी सकाळी नऊच्या सुमारास अचानक मेट्रो स्टेशन गाठून कामाचा आढावा घेतला. कामात येणाऱ्या अडचणींची माहिती मिळवण्यास सांगितले. फुगेवाडी स्टेशन ते पिंपरीच्या संत तुकाराम नगर असा प्रवास केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुणे मेट्रोने (Pune Metro) प्रवास केला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी सुरू असलेल्या कामांबाबतही त्यांनी चर्चा केली. पवारांच्या मेट्रो तपासावर भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्षेप घेतला आहे. मेट्रो कंपनीवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. तसेच त्यांनी संताप व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी सकाळी नऊच्या सुमारास अचानक मेट्रो स्टेशन गाठून कामाचा आढावा घेतला. कामात येणाऱ्या अडचणींची माहिती मिळवण्यास सांगितले. फुगेवाडी स्टेशन ते पिंपरीच्या संत तुकाराम नगर असा प्रवास केला. विशेष म्हणजे पवारांनी उभे राहून प्रवास केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि काही अधिकारीही होते. तसेच फुगेवाडी मेट्रो स्टेशनच्या कामाची माहिती घेतली.
श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? - चंद्रकात पाटील
पवार यांच्या मेट्रोच्या पाहणीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. मेट्रो कंपनीने आज पुण्याच्या एकाही खासदार किंवा आमदाराला न कळवता शरद पवार यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल घेतली. "आम्ही शरद पवारांचा आदर करतो. ते राज्यसभा सदस्य आहेत. पण एवढ्या घाईत चाचणी घेण्याचे कारण काय? ही श्रेयवादाची सुरू असलेली लढाई आहे का? या प्रकल्पाची किंमत सुमारे 11,000 कोटी रुपये आहे. यापैकी 8,000 कोटी रुपये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारचे आहेत. तीन हजार कोटी महापालिकेचा आणि काही प्रमाणात राज्याचा वाटा. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. मात्र वाढत्या कोविड परिस्थितीमुळे त्यास विलंब झाला. मग मेट्रो कंपनी इतकी घाई का करतेय?" असे चंद्रकांत पाटील यांनी विचारले. (हे ही वाचा Pune: मेट्रिमोनियल वेबसाइटवर महिलेची फसवणूक, 62 लाखांचा बसला फटका)
Tweet
फडणवीस सरकार आल्यानंतर हा प्रकल्प खर्या अर्थाने पूर्ण झाला
पुण्यात विविध पक्षांचे आमदार आहेत. त्याना का वगळण्यात आले? “आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम सामान्य जनतेला कळत नाही का? केंद्रामध्ये जेव्हा काँग्रेस आघाडीचे सरकार असताना मेट्रो प्रकल्प का पूर्ण झाला नाही? फडणवीस सरकार आल्यानंतर हा प्रकल्प खर्या अर्थाने पूर्ण झाला. पण आता गोष्टी वेगळ्या आहेत. मेट्रो कंपनीने एवढी घाई का केली?
बंर प्रशासकीय चाचपणी असेल तर शरद पवार का? पाटील म्हणाले की, ते मेट्रोने प्रवास करायचे, त्याचे फोटो छापायचे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकार घडला, हे काय प्रकरण आहे ते सांगायचे. त्याच्या काळात मुंबईचा प्रकल्प बोबंला पण पुण्याचा लांबला. आम्हाल पवार साहेबाना दोष द्यायचा नाही पण आम्ही मेट्रो कंपनीवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे. मात्र, इतर आमदारांनीही तक्रारी कराव्यात, हा आमच्या हक्कावर घाला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)