Ajit Pawar On Nawab Malik: नवाब मलिक यांनी आपली भूमिका अधिकृतपणे मांडल्यानंतर मी माझा मुद्दा मांडणार; देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया
नवाब मलिक यांची अधिकृत भूमिका काय आहे हे समजल्यानंतर मी माझे म्हणणे मांडेन, विधानसभेत कोण कुठे बसायचे, हे मी ठरवत नाही, तो निर्णय सभापती घेतात.'
Ajit Pawar On Nawab Malik: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेस नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहून नवाब मलिक (Nawab Malik) यांना राज्यातील सत्ताधारी आघाडीत सामील करून घेण्यास विरोध केल्यानंतर आज अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी नवाब मलिक यांनी आपली भूमिका अधिकृतपणे मांडल्यानंतर मी आपला मुद्दा मांडणार असल्याचे म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्रानंतर अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'फडणवीस यांचे पत्र मला मिळाले आहे. नवाब मलिक यांची अधिकृत भूमिका काय आहे हे समजल्यानंतर मी माझे म्हणणे मांडेन, विधानसभेत कोण कुठे बसायचे, हे मी ठरवत नाही, तो निर्णय सभापती घेतात.'
दरम्यान, गुरुवारी नवाब मलिक यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी मलिक अजित पवार गटातील नेत्याच्या मागे जावून बसले. नवाब मलिक अजित पवार यांच्या गटात सामील झाल्याने सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना याबाबत पत्र देखील लिहिले. (हेही वाचा -Devendra Fadanvis On Nawab Malik In Mahayuti: 'पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…' आमदार नवाब मलिक महायुतीमध्ये नको; फडणवीसांचे अजित दादांना जाहीर पत्र)
राष्ट्रवादी-अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे की, नवाब मलिक हे पक्षाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते याबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील. बसण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी बसण्याची व्यवस्था केली असेल, तर मला वाटते की त्यांना त्याबद्दल अधिक माहिती असणे आवश्यक आहे. नवाब मलिक हे पक्षाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादीचे आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल भूमिका स्पष्ट केली. याआधी मी अजित पवारांना भेटलो, ते किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते यावर आपली भूमिका स्पष्ट करतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले. (हेही वाचा -Nawab Malik Joins Ajit Pawar's Group: शरद पवारांना मोठा धक्का! माजी मंत्री नवाब मलिक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात सामील)
तत्पूर्वी, नवाब मलिक अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत कोणतीही औपचारिक चर्चा झाली नसल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगितले की, नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जुन्या सहकाऱ्यांप्रमाणे भेटलो. त्यांच्याशी आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर त्यांनी जुन्या सहकाऱ्यांशी संवाद साधणे आणि भेटणे स्वाभाविक आहे.