IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धचा भारत सामना जिंकल्यानंतर विजय साजरा करण्यासाठी जमाव उतरला पुण्यातील रस्त्यावर, गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी केला लाठीमार

एसीपी (सहाय्यक पोलिस आयुक्त) रमाकांत माने म्हणाले: जसे अधिकाधिक लोक येऊ लागले तसतसा जमाव अनियंत्रित झाला. अनेकांनी फटाके फोडायला सुरुवात केली.

Pune Police | (Photo Credits: ANI)

सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषकात (T20 World Cup) भारताचा पाकिस्तानवर (IND vs PAK) विजय साजरा करण्यासाठी रविवारी पुण्यातील गुड लक चौकात (Good Luck Chauk) जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार (Lathi-charge) केला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागात पोलिसांचे पथक आधीच तैनात करण्यात आले होते. एसीपी (सहाय्यक पोलिस आयुक्त) रमाकांत माने म्हणाले: जसे अधिकाधिक लोक येऊ लागले तसतसा जमाव अनियंत्रित झाला. अनेकांनी फटाके फोडायला सुरुवात केली. त्यानंतर जमावाने रस्त्यावर येऊन वाहतूक ठप्प केली. धोकादायक पद्धतीने फटाके फोडले जात होते. हेही वाचा गर्दी रोखण्यासाठी Pune Railway Station वर Platform Ticket ची वाढवली किंमत, 10 रुपयांवरून 30 रुपये झाली वाढ

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सौम्य बळाचा वापर करावा लागला. लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आम्ही पाण्याचा वापर करून मोठा जमाव पांगवला. शहरातील आणखी काही ठिकाणी पोलिस पथके तैनात करण्यात आली होती. जिथे भारताचा पाकिस्तानवर टी20 विजय साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif