अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय कोठडी सुनावलेल्या वकील संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 30,000 रुपयांच्या जामीनावर पुनाळेकरांची सुटका करण्यात आली आहे. (अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी)
ANI ट्विट:
Advocate Sanjeev Punalekar, an accused in Narendra Dabholkar murder case, has been granted bail by Pune sessions court on a surety amount of Rs 30,000
— ANI (@ANI) July 5, 2019
दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर यांनी हत्यारांची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यासाठी त्यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. यापूर्वी ते 4 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत होते. त्यानंतर तपासात पुनाळेकरांच्या मोबाईलमधून महत्त्वाची माहिती हाती लागल्याने त्यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वीच दाभोलकर हत्येप्रकरणातील संशयित शरद कळसकर याने सचिन अंदुरे याच्या मदतीने दाभोलकरांची हत्या केल्याचे कबूल केले होते. तसंच डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकरांनीच दिल्याचेही त्याने सांगितले.