Tanaji Sawant On Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा; तानाजी सावंत यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभरातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Tanaji Sawant, Aaditya Thackeray (PC- Facebook)

Tanaji Sawant On Aaditya Thackeray: आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant) यांनी आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. त्यांना राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. तानाजी सावंत पुढे बोलताना म्हणाले की, माझ्या विभागाकडे राज्यातील चार मेंटल हॉस्पिटल आहेत. चार मेंटल हॉस्पिटलपैकी एका हॉस्पिटलमध्ये आदित्य ठाकरेंसाठी बेड आरक्षित ठेवणार आहे.

दरम्यान, तानाजी सावंत यांच्या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसैनिक वर्गणी काढून सावंत यांच्यासाठी कृपामाई मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड राखून ठेवणार असल्याचे हाके यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Sanjay Raut Writes Letter to Devendra Fadanvis: संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र; रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्येप्रकरणी लक्ष घालण्याची केली विनंती)

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर तानाजी सावंत यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांकडून माळशिरस तालुक्यात सावंत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. पन्नास खोके घेऊन सावंत यांचेच डोके ठिकाणावर नसून त्यांनाच मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, अशी घोषणाबाजी शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून होत आहे.

दरम्यान, तानाजी सावंत यांनी म्हटलं होत की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना वारंवार आव्हानाची भाषा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांची मानसिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड ठेवायची व्यवस्था करू.

तथापी, शुक्रवारी तानाजी सावंत माढा तालुक्यातील वाकाव या त्यांच्या गावी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभरातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif