आमदारकीच्या शपथविधीनंतर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; नव्या महाराष्ट्रासाठी तिन्ही पक्ष एकत्र करणार काम
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, असा प्रश्न राज्यातील जनतेसमोर पडला होता. यातच मंगळवारी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी (Shivsena-NCP-Congress) यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीच्यानंतर राज्यात मोठी हालचाल निर्माण झाली होती. महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, असा प्रश्न राज्यातील जनतेसमोर पडला होता. यातच मंगळवारी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी (Shivsena-NCP-Congress) यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान होणार आहेत, असा निर्णय तिन्ही पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे. दरम्यान, राज्याला मिळणारे नवे सरकार देशाला आणि महाराष्ट्राला नवीन दिशा देणारे ठरणार आहे, असे वक्तव्य अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने अधिक जागा मिळवल्या तरीदेखील मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात मोठा वाद निर्माण झाला. दोन्ही पक्ष एकमतावर ठाम असल्यामुळे 30 वर्षाची असलेली युतीचा अखेर तुटली. त्यानंतर शिवसेना पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासह हात मिळवणी करुन महाराष्ट्राला महाविकासआघाडीच्या रुपात नवे सरकार दिले. महाविकासआघाडीने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतूक केले जात आहे. अदित्य ठाकरे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राला आणि देशाला आता नवी दिशा मिळणार आहे. आम्ही सर्व सोबत मिळून काम करणार आहोत. तसेच मंत्रीमंडळात कोणत्या नेत्याला काय स्थान मिळणार हे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ठरवतील, असेही त्यावेळी अदित्य ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच उद्धव ठाकरे यांनी घेतला शरद पवार यांचा आशिर्वाद
शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकत्र आल्याने महाराष्ट्राच मुख्यमंत्री कोण या प्रश्नाला पूर्णविराम लागला आहे. महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.