आदित्य ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यामागचं नेमकं कारण काय?

त्यांच्या या पुणे भेटीचं संयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून करण्यात आलं आहे.

आदित्य ठाकरे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Aditya Thackeray To Visit Pune: महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे 30 जानेवारी रोजी (गुरुवारी) पुणे भेटीवर  जाणार आहेत. त्यांच्या या पुणे भेटीचं संयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान त्याच्या या पुणे भेटीचं नक्की उद्दिष्ट काय असेल हे अद्याप सांगण्यात आलं नसलं तरी ते या दौऱ्याच्या वेळी महापालिकेच्या सांडपाणी आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान ते राजाराम पूल येथील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाला देखील भेट देऊन त्याची पाहणी करणार आहेत.

आदित्य ठाकरे (Aditya Thakeray Pune Visit) वडगाव धायरी येथील दीडशे टनाच्या मिक्‍स कचरा प्रक्रिया प्रकल्पासह इतर कचरा प्रकल्पांनाही भेट देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार त्यांची ही पुणे भेट ही विकास कामांवर भर देण्यासाठी अधिक असून त्यामागे कोणतेही राजकीय उद्दिष्ट असण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांचा 'मुंबई नाईट लाईफ' हा उपक्रम ठरला हिट की फेल? जाणून घ्या

तसेच आदित्य ठाकरे यांनी सुरु केलेल्या 'मुंबई नाईट लाईफ' (Mumbai Night Life) या उपक्रमाला तसा मुंबईत पहिल्या काही दिवसात मात्र अल्पसा प्रतिसाद मिळाला आहे. पण हाच उपक्रम मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही सुरु (Pune Night Life) करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.