Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा, म्हणाले..

अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करणार का? असा सवाल विचारत आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

राज्याच्या राजकारणात सध्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) विरुध्द राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) वाद चांगलाचं तापला आहे. सुप्रिया सुळेच्या (Supriya Sule) खोके आरोपास प्रत्त्युत्तर देताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरल्याने राष्ट्रावादी कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. एवढचं नाही तर कॉग्रेस (Congress) आणि शिवसेनेकडून (Shivsena) देखील सत्तारांच्या वक्तव्यास विरोध दर्शवत राष्ट्रवादीस (NCP) पाठींबा दिला आहे. तसेच आता महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणजे राज्यभरातील विरोधकांकडून अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) वक्तव्याचा निषेध करत सत्तारांचा राजीनामा (Resignation) मागितल्या जात आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देखील यावर भाष्य केलं असुन अब्दुल सत्तारांवर कसून टीका केली आहे. एवढचं नाही तर अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील आमदार आदित्य ठाकरेंनी केली आहे.

 

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना पदमुक्त करणार का? असा सवाल विचारत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Government) निशाणा साधला आहे. याआधी टीईटीचा घोटाळा (TET Scam) , ओला दुष्काळ ,महिलेला शिवीगाळ करणं हा घाणेरडा आणि गलिच्छ प्रकार आहे. त्यांच्या मनातलं लोकांसमोर आलं आहे. त्यांना पदमुक्त करणं गरजेचं आहेच, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) काही जबाबदारी घेणार का कारण मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाहीत, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) लगावला आहे. (हे ही वाचा:- Har Har Mahadev Controversy: हर हर महादेव सिनेमच्या शो दरम्यान ठाण्यातील सिनेमागृहात मोठा राडा, प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची)

 

तसेच अब्दुल सत्तार (Abdul Sattar) काही वेळेस आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) छोटा पप्पू म्हणून संबोधले आहे. या टीकेला ही प्रत्त्युत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले मला छोटा पप्पू म्हण्टल्याने राज्यातील प्रश्न सुटत असतील तर खुशाल म्हणा, माझी हरकत नाही. तरी गेले काही दिवसात आदित्य ठाकरे शिंदे फडणवीस सरकार विरुध्द चांगलेचं आक्रमक झाल्याचं चित्र आहे.