Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: बदलापूरातील आदर्श शाळा बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक गैरवर्तन आणि अत्याचार (Badlapur Sexual Assault Case) केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केली होती.

Badlapur Sexual Assault Case | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बदलापूर मध्ये आदर्श विद्यालय (Adarsh School Badlapur Sexual Abuse Case) च्या दोन विद्यार्थींनीवर शाळेत सफाई कर्मचार्‍याकडून लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली होती. शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक गैरवर्तन आणि अत्याचार (Badlapur Sexual Assault Case) केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केली होती.  ही बाब 17 ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी कल्याण बार असोसिएशनच्या सर्व वकिलांनी आरोपींचा बचाव न करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणी आता नवीन अपडेट समोर आली असून आरोपी अक्षय शिंदेच्या न्यायालयिन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. (हेही वाचा - Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: धक्कादायक! शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब, दिपक केसरकर यांचा शाळेच्या मॅनेजमेंटवर कारवाईचा इशारा)

पाहा पोस्ट -

बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणाची सुनावणी विशेष महिला न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांच्या न्यायालयात झाली. यादरम्यान सरकारी वकिलाने सांगितले की, या प्रकरणात POCSO अंतर्गत आरोप जोडण्यात आले आहेत. या जघन्य गुन्ह्याच्या तपासासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. AVPS च्या विश्वस्त मंडळाला निलंबित करण्यात आले आहे आणि सध्याचे कामकाज हाताळण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान अल्पवयीन मुलींचा अनेकवेळा लैंगीक छळ झाल्याचे उघड झाल्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी तपासात समोर आलेल्या महत्वाच्या माहितीचा खुलासा केला. आदर्श शाळेमध्ये 15 दिवसांचे सीसीटिव्ही रेकॉर्डिंग गायब असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत.