Adani Energy Solutions खारगर-विक्रोळी ट्रान्समिशन लाइन कार्यान्वित

मुंबई शहराला अतिरिक्त 1,000 मेगावॅट वीज पुरवठा करणारी खारगर-विक्रोळी ट्रान्समिशन लाईन (Kharghar Vikhroli Transmission Ltd)कार्यन्वीत केल्याची माहिती अदानी एनर्जी सोल्युशनने सोमवारी (02 ऑक्टोबर) दिली आहे.

Power Grid | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Adani Energy News: मुंबई शहराला अतिरिक्त 1,000 मेगावॅट वीज पुरवठा करणारी खारगर-विक्रोळी ट्रान्समिशन लाईन (Kharghar Vikhroli Transmission Ltd)कार्यन्वीत केल्याची माहिती अदानी एनर्जी सोल्युशनने सोमवारी (02 ऑक्टोबर) दिली आहे. या लाईनला KVTL नावाने ओळखले जाईल. जी शहराची अतिरिक्त वीजेची मागणी सक्षमपणे पूर्ण करेल, असा विश्वासही कंपनीने आज व्यक्त केला. कंपनीने याबाबत एक निवेदन प्रसारीत करुन माहिती दिली आहे.

पूर्वी अदानी ट्रान्समिशन लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड द्वारा उभारण्यात आलेला हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. जो ट्रान्समिशन कॉरिडॉरची विद्यमान क्षमता वाहून नेण्यासाठी अधिक सक्षम ठरेल असे कंपनीला वाटते. मुंबई शहरात या पूर्वी दोन वेळा ग्रीड निकामी झाले होते. ज्यामुळे 12 ऑक्टोबर 2020 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी महानगरातील बरीच ठिकाणे आणि परिसर अंधारात गेला होता. भविष्यातील अशा कोणत्याही घटना टाळण्यासाठी खारघर-विक्रोळी लाईनमुळे भविष्यात कामी येळी. ज्याद्वारे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई शहराला 1,000 मेगावॅट अतिरिक्त विश्वासार्ह वीज मिळेल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, हा प्रकल्पाच्या कार्यान्वित झाल्यामुळे, मुंबईला त्याच्या महानगरपालिकेस भौगोलिक 400 KV ग्रिड मिळेल, ज्यामुळे त्यांच्या वीज ग्रीडमध्ये आयात क्षमता वाढेल आणि विश्वासार्हता आणि स्थिरता सुधारली जाईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, KVTL मध्ये अंदाजे 74 सर्किट किलोमीटर 400 kV आणि 220 kV ट्रान्समिशन लाइन्सचा समावेश आहे, तसेच विक्रोळी येथे 1,500 MVA 400kV गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन (GIS) समाविष्ट आहे, हे मुंबईतील पहिले 400KV सबस्टेशन आहे. अंदाजे 9,500 चौरस मीटर क्षेत्रफळ व्यापलेले, 400 KV सबस्टेशन्सच्या बाबतीत हे सर्वात संक्षिप्त डिझाइन आहे. त्याची अनोखी रचना 400kV आणि 220kV GIS चे अनुलंब स्टॅक करते, त्यामुळे जागेची आवश्यकता कमी होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now