IPL Auction 2025 Live

Actor Govinda Likely to Join Shiv Sena today: अभिनेता गोविंदा यांचा आज शिवसेना प्रवेश होण्याची शक्यता, करीश्मा कपूर आणि Kareena Kapoor मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

तसे संकेत काही दिवसांपासूनच मिळत होते. दरम्यान, गोविंदा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रवेश (Actor Govinda Likely to Join Shiv Sena) आजच (28 मार्च) पार पडणार असल्याची चर्चा आहे.

Eknath Shinde And Govinda Ahuja | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अभिनेता गोविंदा अहूजा (Govinda Ahuja) पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होणार असल्याची चर्चा आहे. तसे संकेत काही दिवसांपासूनच मिळत होते. दरम्यान, गोविंदा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रवेश (Actor Govinda Likely to Join Shiv Sena) आजच (28 मार्च) पार पडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अभिनेत्याने पक्षात प्रवेश केल्यास त्याला मुंबई उत्तर पश्चिम  लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जात आहे. दुसऱ्या बाजूला अभनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) या दोन्ही बहिणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचल्या आहेत. या भेटीचे नेमके कारण बाहेर आले नाही. मात्र, सध्याची राजकीय रणधुमाळी पाहता अनेकांच्या भूवया मात्र उंचावल्या आहेत.

गोविंदा: अभिनेता ते राजकारणी

अभिनेता गोविंदा यांना राजकारण हे क्षेत्र तसे नवे नाही. अभिनयात करिअर केल्यानंर आणि या क्षेत्रातून सिनेमाच्या पडद्यावरील वावर काहीसा कमी झाल्यानंतर अभिनेत्याने राजकारणात पाऊल ठेवले. लोकसभा निवडणूक 2004 मध्ये काँग्रेस पक्षाने भाजपा उमेदवार राम नाईक यांच्या विरोधात मैदानात उतरवले. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात राम नाईक विरुद्ध गोविंदा ही लढत अतिशय दमदार आणि तितकीच उत्कंटावर्धक झाली. राम नाईक हे तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री होते. त्यांच्या मतदारसंघावर त्यांची चांगली पकड होती. मात्र, विरार का छोरा म्हणत गोविंदा मैदानात उतरला आणि त्याने राम नाईक यांचा जवळपास 48,271 मतांनी पराभव केला. दरम्यान, प्रदीर्घ काळानंतर राम नाईक यांनी लिहिलेल्या त्यांच्या 'चरैवेती चरैवेती' या आत्मचरित्रात दावा केला की, गोविंदा याने ती निवडणूक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या पैशांवर लढली होती. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या 'धनुष्यबण' तर स्वरा भास्कर आणि राज बब्बर काँग्रेसच्या 'पंजा'वर लढणार निवणूक? राजकीय वर्तुळात चर्चा)

गोविंदा यांची राजकीय कामगिरी अत्यंत सुमार

राम नाईक यांनी केलेला दावा अर्थातच गोविंदा यांनी फेटाळून लावला. पण, पुढे गोविंदा याची निवडून आल्यानंतर लोकसभेतील कामगिरी तशी उल्लेखनीय राहिली नाही. त्याची लोकसभेतील उपस्थितीही फारशी समाधानकारक नव्हती. तो अचानक राजकीय पटलावरुनही बाजूला झाला. दरम्यन, आता तब्बल 20 वर्षांनी पुन्हा एकदा गोविंदा राजकारणाच्या मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. मतदार त्याला स्वीकारणार का? आणि का? याबाबत मात्र उत्सुकता कायम आहे. (हेही वाचा, खासदार नवनीत राणा यांचा गोविंदासोबत 'चलो इश्क लडाए सनम' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

दरम्यान, एकनात शिंदे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना पक्षात बंड केले. त्यांनी बरेचसे आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन शिवसेना पक्षावरच दावा ठोकला. निवडणूक आयोगानेही त्यांना शिवसेना हे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह बहाल केले. असे असले तरी मुंबई शहरात एकनात शिंदे याना शिवसेना आणि आपला प्रभाव वाढवता आला नाही. पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. त्यामुळे खासदार त्यांच्यासोबत आले तरी त्यांना काही लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची कमतरता भासत आहे. अशा वेळी अभिनेता, खेळाडू अथवा सेलिब्रेटीला मैदानात उतरवले तर सामना काहीसा सोपा जाईल, अशी अटकळ बांधून अभिनेत्याचा पक्षप्रवेश घडवून आणला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.