Actor Govinda Ahuja joins Shiv Sena: अभिनेता गोविंदा यांचा शिवसेना पक्षात प्रवेश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्वागत
Lok Sabha Election 2024: अभिनेता गोविंदा अहूजा यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षात प्रवेश (Actor Govinda Ahuja joins Shiv Sena) केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षाचा झेंडा आणि भगवा गमछा त्यांच्या गळ्यात घातला आणि आज (28 मार्च) हा पक्षप्रवेश पार पडला.
Lok Sabha Election 2024: अभिनेता गोविंदा अहूजा यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षात प्रवेश (Actor Govinda Ahuja joins Shiv Sena) केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षाचा झेंडा आणि भगवा गमछा त्यांच्या गळ्यात घातला आणि आज (28 मार्च) हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी मुख्यमंत्र्यांसह विधान परिषदेच्या अध्यक्षा निलम गोऱ्हे, कृषीमंत्री दादा भूसे, मिलींद देवरा, यांच्यासह अनेक शिवसेना नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जवळास प्रदीर्घ काळानंतर मी राजकारणात पुन्हा सक्रीय होतो आहे. मला सुरुवातीला वाटले नव्हेत की, मी या बाजूला म्हणजेच राजकारणात पुन्हा सक्रीय होईल. पण, परमेश्वराची कृपा मोठा वनवास संपवून मी पुन्हा या क्षेत्रात पदार्पण करतो आहे, असी भावना या वेली अभिनेता गोविंदा यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची माझ्यावर कृपा- गोविंदा
अभिनेता गोविंदा यांनी पुढे बोलताना म्हटले की, या आधी काही वर्षांपूर्वी मी 10 मिनीटांचे भाषण केले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी आज पुन्हा आपल्यासमोर बलतो आहे. माझ्या एकूण करीअरमध्ये राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुळ बाळासाहेब ठाकरे यांची माझ्यावर कृपा राहिली. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझ्या आईवडीलांचे चांगले संबंध होते. प्रदीर्घ काळानंतर मी मराठीमध्ये बोललो. आज राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विकास पाहायला मिळतो आहे. पूर्वीच्या तुलनेत मुंबई शहराचाही विकास घडतो आहे, असे कौतुकोद्गारही गोविंदा यांनी या वेळी काढले. (हेही वाचा, Actor Govinda Likely to Join Shiv Sena today: अभिनेता गोविंदा यांचा आज शिवसेना प्रवेश होण्याची शक्यता, करीश्मा कपूर आणि Kareena Kapoor मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला)
अभिनेता गोविंदा यांचे मी शिवसेना पक्षात स्वागत करतो. शिवसेना पक्षात त्यांना मान-सन्मान आणि सर्व काही मिळेल, काम करण्याची संधी मिळेल, असे उद्गार या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी गोविंदा यांनी कोणत्याही प्रकारच्या नियम, अटी घातल्या नाहीत. शिवसेना आणि सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे ते पाहून ते प्रभावीत झाले आणि त्यांनी पक्षात प्रवेश केला. दरम्यान, त्यांना लोकसभा निवडणूक लढणार का? असे विचारले असता शिंदे म्हणाले, गोविंदा यांनी तशी अजून काही मागणी केली नाही. पण पक्षाचे काम करण्यासाठी ते नेहमी तत्पर राहतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या 'धनुष्यबण' तर स्वरा भास्कर आणि राज बब्बर काँग्रेसच्या 'पंजा'वर लढणार निवणूक? राजकीय वर्तुळात चर्चा)
व्हिडिओ
# Live📡| 28-03-2024
📍 मुंबई
🎥 शिवसेना पक्षात विविध लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश | पत्रकारांशी संवाद https://t.co/if6jATCLer
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 28, 2024
गोविंदा: अभिनेता ते राजकारणी
अभिनेता गोविंदा यांना राजकारण हे क्षेत्र तसे नवे नाही. अभिनयात करिअर केल्यानंर आणि या क्षेत्रातून सिनेमाच्या पडद्यावरील वावर काहीसा कमी झाल्यानंतर अभिनेत्याने राजकारणात पाऊल ठेवले. लोकसभा निवडणूक 2004 मध्ये काँग्रेस पक्षाने भाजपा उमेदवार राम नाईक यांच्या विरोधात मैदानात उतरवले. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात राम नाईक विरुद्ध गोविंदा ही लढत अतिशय दमदार आणि तितकीच उत्कंटावर्धक झाली. राम नाइक हे तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री होते. त्यांच्या मतदारसंघावर त्यांची चांगली पकड होती. मात्र, विरार का छोरा म्हणत गोविंदा मैदानात उतरला आणि त्याने राम नाईक यांचा जवळपास 48,271 मतांनी पराभव केला. दरम्यान, प्रदीर्घ काळानंतर राम नाईक यांनी लिहिलेल्या त्यांच्या 'चरैवेती चरैवेती' या आत्मचरित्रात दावा केला की, गोविंदा याने ती निवडणूक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या पैशांवर लढली होती. (हेही वाचा, खासदार नवनीत राणा यांचा गोविंदासोबत 'चलो इश्क लडाए सनम' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
गोविंदा यांची राजकीय कामगिरी अत्यंत सुमार
राम नाईक यांनी केलेला दावा अर्थातच गोविंदा यांनी फेटाळून लावला. पण, पुढे गोविंदा याची निवडून आल्यानंतर लोकसभेतील कामगिरी तशी उल्लेखनीय राहिली नाही. त्याची लोकसभेतील उपस्थितीही फारशी समाधानकारक नव्हती. तो अचानक राजकीय पटलावरुनही बाजूला झाला. दरम्यन, आता तब्बल 20 वर्षांनी पुन्हा एकदा गोविंदा राजकारणाच्या मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. मतदार त्याला स्वीकारणार का? आणि का? याबाबत मात्र उत्सुकता कायम आहे. कीय वर्तुळात चर्चा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2024 05:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

